व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन फिचर : एकाच वेळी 50 जणांना व्हिडीओ कॉल

0
392

लवकरच व्हॉट्सअ‍ॅपवर एकाचवेळी 50 जणांना व्हिडीओ कॉल करता येणार आहे (Whatsapp new features). पुढील काही दिवसात व्हॉट्सअ‍ॅपकडून हे फिचर लाँच केले जाणार आहे. याशिवाय व्हॉट्सअ‍ॅपकडून आणखी काही इतर नवनवीन फिचर लाँच केले जाणार आहेत. नुकतेच व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या युझर्ससाठी डार्क मोड, डिलिट मेसेज फिचर लाँच केले होते.

फेसबुकने कोरोना काळात व्हिडीओ कॉलिंगचा वाढता वापर लक्षात घेऊन मेसेंजरवर रुम फिचर लाँच केले होते. तसेच कंपनी आता लवकरच व्हॉट्सअ‍ॅप युझर्ससाठीही रुम फिचर जारी करणार आहे. रुम फिचरच्या माध्यमातून एकावेळेस जवळपास 50 व्हॉट्सअ‍ॅप आणि व्हॉट्सअ‍ॅप वेब युझर्स व्हिडीओ कॉल करु शकणार आहेत. त्यामुळे युझर्सला याचा खूप फायदा होईल, असं कंपनीने म्हटले.

झूम आणि गुगल मीटला टक्कर देण्यासाठी फेसबुकने हे फिचर आणल्याचं सांगितलं जात आहे. हे फिचर सर्वांसाठी उपलब्ध असून लवकरच व्हॉट्सअ‍ॅप वरुन हे फिचर वापरण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. थेट व्हॉट्सअ‍ॅपवरुन तुमच्या फेसबुक फ्रेण्ड लिस्टमधील लोकांना व्हिडिओ कॉल करता येणार आहे. अनेक बीट व्हर्जनमध्ये यासंदर्भातील पर्याय युझर्सला उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युझर्ससाठी लवकरच आणखी एक नवीन फिचर लाँच करणार आहे. ज्याचे नाव मल्टि डिव्हाईस फिचर आहे. या फिचरच्या माध्यमातून युझर्स एक अकाऊंट चार वेगवेगळ्या मोबाईलमधून चालवू शकता. डाटा सिंक करण्यासाठी वाय-फायचा वापर करावा लागणार आहे. या फिचरचा खुलासा वेब बीटा इंफोने केला.

व्हॉट्सअ‍ॅप व्हिडीओ कॉल बटन

व्हॉट्सअ‍ॅप व्हिडीओ कॉलिंग आणखी उत्कृष्ट करण्यासाठी एक वेगळे बटन जोडले जाणार आहे. या बटनच्या माध्यमातून युझर्स सहज ग्रुपमध्ये व्हिडीओ कॉल करु शकणार आहे. सध्या कंपनीकडून या फिचरबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही.