जेम्स अँडरसन:कसोटी क्रिकेटमध्ये 600 विकेट घेणारा पहिला वेगवान गोलंदाज

0
313

पाकिस्तानविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्याच्या अखेरच्या दिवशी इंग्लंडचा अनुभवी जलदगती गोलंदाज जेम्स अँडरसनने विक्रमाला गवसणी घातली. पाकिस्तानचा कर्णधार अझर अलीला माघारी धाडत अँडरसनने कसोटी क्रिकेटमध्ये ६०० बळींचा टप्पा गाठला. जेम्स अँडरसन कसोटीत ६०० बळी घेणारा जगातील पहिला वेगवान गोलंदाज बनला आहे. पाकविरुद्ध तिसऱ्या कसोटीत अजहर अलीला बाद केल्यानंतर त्याने हे यश मिळवले. यापूर्वी तीन फिरकीपटूंनी ६०० पेक्षा अधिक विकेट घेतल्या. अँडरसनला हा विक्रम करण्यासाठी ३३ हजार ७१७ चेंडू टाकावे लागले. सर्वात कमी चेंडूंत ६०० बळी घेण्याच्या बाबतीत तो दुसऱ्या स्थानी पोहोचला. मुरलीधरनने (३३७११) सर्वात कमी चेंडूत ही कामगिरी केली.

अँडरसनच्या आधी ही कामगिरी करणारे गोलंदाज हे सर्व फिरकी गोलंदाज आहेत. अँडरसनने कारकिर्दीतील १५६ व्या कसोटी सामन्यात ही कामगिरी केली आहे. याआधी मुथय्या मुरलीथरन, शेन वॉर्न आणि अनिल कुंबळे यांनी ६०० बळींचा टप्पा गाठला आहे.

अँडरसनला ६००व्या बळीसाठी खूप वाट पाहावी लागली. कसोटीच्या अखेरच्या दिवसातली पहिली दोन सत्र पावसाच्या व्यत्ययामुळे वाया गेली. त्यामुळे अँडरसनला आपला विक्रम करण्यासाठी आणखी वाट पहावी लागणार की काय असं चित्र तयार झालं होतं. परंतु अखेरच्या सत्रात पावसाने उसंत घेतल्यानंतर खेळ सुरू झाला. तेव्हा अँडरसनने पाकिस्तानचा कर्णधार अझर अलीला उसळत्या चेंडूवर माघारी धाडले आणि ६०० वा बळी टिपला.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील चौथा खेळाडू

मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका) – 800 विकेट
शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया) – 708 विकेट
अनिल कुंबळे (भारत) – 619 विकेट
जेम्स अँडरसन (इंग्लंड) – 600* विकेट

जेम्स अँडरसनची कसोटी कारकिर्द

सामने- 156
डाव – 291
विकेट्स- 600
सरासरी- 26.81