सीबीआय आणि सीआयडी म्हणजे काय ?

0
1130

CID (Crime investigation department) म्हणजे काय ?

CID चे फुलफॉर्म क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट असे आहे, जे की, एका प्रदेशातील, राज्यातील तपासासाठी ओळखली जाते. CID कडे पोलिसांचा तपास आणि काही इतर विभाग असतात. या विभागात हत्या, दंगा, अपहरण व चोरी इत्यादी गुन्ह्यासंदर्भातील तपासकामे सोपवली जातात. CID ची स्थापना, पोलिस आयोगाच्या शिफारशीवर ब्रिटिश सरकारने १९०२ मध्ये केली होती. पोलिस कर्मचाऱ्यांना यात सामील करण्याआधी खूप साऱ्या परिक्षांना तोंड द्यावे लागते. या संस्थेच्या तपासाचे कामकाज कधीकधी राज्य सरकार, तर कधी उच्च न्यायालयाकडे सोपवले जाते.

CBI (Central Bureau of Investigation) म्हणजे काय ?

केंद्रीय तपास ब्युरो किंवा CBI हि एक तपास संस्था आहे. हि राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर होणारे भ्रष्टाचार, हत्या, घोटाळे याबद्दल तपास करते. CBI एंजसीची स्थापना १९४१ मध्ये झाली आणि तिला एप्रिल १९६३ मध्ये केंद्रीय तपास कक्ष नाव देण्यात आले, ज्याचे मुख्य केंद्र दिल्लीला आहे. दिल्ली विशेष पोलिस प्रतिष्ठान अधिनियम, १९४६ मध्ये CBI ला तपासाची सहमती देण्यात आली असून, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय व राज्य सरकारच्या सहमतीशिवाय हि तपास संस्था कोणत्याही भागात हस्तक्षेप करू शकत नाही.

सीबीआय म्हणजे केंद्रीय अन्वेषण विभाग

  • केंद्र सरकारच्या अखत्यारितील ही संस्था देशभरात कुठेही घडलेल्या गुन्ह्याची चौकशी करु शकते.
  • 1941 साली स्पेशल पोलीस इस्टॅब्लिशमेंट आणि 1963 ला सीबीआय म्हणून ओळख
  • संपूर्ण देश हे कार्यक्षेत्र आहे.
  • लाचलुचपत विभाग, आर्थिक गुन्हे, धोरणात्मक विभाग, विशेष गुन्हे शाखा, फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी, प्रशासकीय विभाग हे कार्यक्षेत्र
  • देशपातळीवरील हत्या, भ्रष्टाचार यांसारख्या गंभीर गुन्ह्यांची चौकशी
  • गंभीर गुन्ह्यांमध्ये सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट किंवा केंद्र सरकारकडून चौकशीचा आदेश दिला जातो.

सीआयडी म्हणजेच क्राईम इन्वेस्टिगेशन डिपार्टमेंट

  • राज्य सरकारच्या अखत्यारितील पोलीस विभागातील ही यंत्रणा राज्यातील गुन्ह्यांचा तपास करते.
  • 1902 साली ब्रिटीश सरकारच्या काळात स्थापना
  • संपूर्ण राज्य हे कार्यक्षेत्र आहे.
  • फिंगर प्रिंट ब्युरो, गुन्हे शाखा आणि सीआयडी, अँटी नार्कोटिक्स सेल, मानव तस्करीविरोधी विभाग या विभागात चौकशीचा अधिकार
  • पोलीस आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यातील दंगल, हत्या यांसारख्या प्रकरणांची चौकशी केली जाते.
  • राज्य सरकार किंवा हायकोर्ट चौकशीचा आदेश देऊ शकतं.                                                                                                                                                                                                 CBI आणि CID मधील प्रमुख फरक:-१) CID च्या ऑपरेशनचे क्षेत्र खूप लहान असते (केवळ एक प्रदेश), पण CBI चे ऑपरेशन क्षेत्र त्यामानाने मोठे असते (पुर्ण एक देश तसेच विदेशही)

    २) CID जवळ येणाऱ्या तपासकामांच्या आदेशांना राज्य सरकार व हायकोर्टद्वारे पाठवले जाते, पण CBI ला तपासकामे व चौकशीचे आदेश, केंद्र सरकार,राज्य सरकार व हायकोर्टद्वारे सोपविले जातात.

    ३) CID राज्यांमध्ये होणारे दंगा, हत्या, अपहरण व चोरी यांचा तपास करते, पण CBI राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील घोटाळे, धोकेबाजी, हत्या, संस्थांचे घोटाळे या गोष्टीचा तपास करण्याचा अधिकार आहे.

    ४) जर कोणत्याही व्यक्तीला CID मध्ये सामिल व्हायचे असेल तर, त्याला राज्य सरकारद्वारे आयोजित केलेल्या स्पर्धा परिक्षा पास कराव्या लागतात, पण CBI मध्ये भरती होण्यासाठी SSC बोर्डातर्फे आयोजित केलेली परिक्षा पास करावी लागते