माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी यांचं निधन

0
349

देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं आज वयाच्या 84 व्या वर्षी निधन झालं आहे. दिल्लीतील रिसर्च अँड रेफरल रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुत्र अभिजीत यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपाचार सुरु होते. मेंदूत गाठ असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

१० ऑगस्टपासून प्रणव मुखर्जी यांची प्रकृती बिघडली होती. १० ऑगस्ट रोजी त्यांच्या मेंदूत असलेल्या गाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. दरम्यान एक दिवस आधी त्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. रुग्णालयात दाखल झाल्यापासून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नव्हती. त्यानंतर ते कोमात गेले आहेत असल्याचं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं होतं.

माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचा जन्म 11 डिसेंबर 1935 रोजी पश्चिम बंगला येथील बिरभूम येथे झाला. पाच दशकांहून अधिक त्यांची राजकीय कारकिर्द आहे. प्रणव मुखर्जी यांनी 2012 ते 2017 पर्यंत राष्ट्रपती पद भूषवलं होतं. ते देशाचे तेरावे राष्ट्रपती होते. 25 जुलै 2012 ला राष्ट्रपतीपदाची घेतली शपथ घेतली होती. त्यांनी परराष्ट्र मंत्री, संरक्षण मंत्री, वाणिज्य मंत्री आणि अर्थमंत्री म्हणूनही काम पाहिलं आहे.

प्रणव मुखर्जी हे भारताचे १३ वे राष्ट्रपती होते. राष्ट्रीय राजकारणात ते १९६९ पासून सक्रिय होते. भारतीय राजकारणातील अमूल्य सेवेसाठी त्यांना २००८ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. तर ८ ऑगस्ट २०१९ रोजी त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

भारताच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात प्रणव मुखर्जी हे राजकारणात सक्रिय झाले होते. १९७३ मध्ये ते केंद्रीय मंत्रिमंडळात होते. १९८२ ते ८४ या काळात त्यांनी देशाचं अर्थमंत्रीपद भुषवलं. १९८० ते १९८५ या कालावाधीत राज्यसभेत ते लीडर ऑफ हाऊसही होते.

प्रणव मुखर्जींबद्दल महत्त्वाचे-

  • आय एम एफ, वर्ल्ड बॅंक, एशियन डेव्हलपमेंट बॅंकेच्या संचालक मंडळातही होते
  • भारतीय अर्थव्यवस्थेवर अनेक पुस्तकांचं लेखन
  • 2008 मध्ये पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मान
  • 1969 पासून पाच वेळा राज्यसभेत तर 2004 पासून दोनदा लोकसभेवर निवड
  • 1991 से 1996 पर्यंत योजना आयोगाचे उपाध्यक्ष
  • 1993 से 1995 पर्यंत वाणिज्य मंत्री
  • 1995 ते 1996 पर्यंत परराष्ट्र मंत्री
  • 2004 से 2006 पर्यंत संरक्षण मंत्री
  • 2006 ते 2009 पर्यंत परराष्ट्र मंत्री
  • 2009 से 2012 पर्यंत अर्थमंत्री

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्वीट करून प्रणव मुखर्जी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. “माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनाबद्दल ऐकून मन दुखावलं. त्यांचा मृत्यू एका युगाचा अंत आहे. प्रणव मुखर्जी यांचे कुटुंबीय, मित्र आणि सर्व देशवासियांबद्दल मी मनापासून शोक व्यक्त करतो. भारतरत्न प्रणव मुखर्जी यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये परंपरा आणि आधुनिकतेचा अनोखा संगम होता. 5 दशकांच्या त्यांच्या सार्वजनिक जीवनात, अनेक उच्च पदांवर असूनही ते नेहमीच जमिनीशी जोडले गेले. त्यांच्या सभ्य आणि मनमिळावू स्वभावामुळे ते राजकीय क्षेत्रात लोकप्रिय होते.