Samsung Galaxy M51 नवा स्मार्टफोन होतोय लवकरच लाँच

0
684

OPP आणि realme ला टक्कर देण्यासाठी सॅमसंग कंपनीनं दमदार सिरिज लाँच केली आहे. A आणि M सिरीजचे नवीन फोन अगदी कमी बजेटपासून अत्याधुनिक सुविधांपर्यंत कमी किंमतीत जास्त चांगले फीचर्स देण्याचा प्रयत्न केला आहे. सॅमसंग एक नवीन स्मार्टफोन Galaxy M51 लवकरच ग्राहकांसाठी उपलब्ध करणार आहे . या फोनची सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याची बॅटरी. रिपोर्ट्सनुसार या फोनला 7000mAh बॅटरी देण्यात येणार आहे. 7000mAh बॅटरी सध्या केवळ निवडक स्मार्टफोनमध्ये उपलब्ध आहे.

10 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता हा फोन ऑनलाइन लाँच होणार आहे. या फोनची किंमत साधारण 31, 400 च्या आसपास असण्याची शक्यता आहे. अॅमेझॉनवर देखील या फोनचा सेल असणार आहे. 6.7 इंचाच या फोनला पंच होल डिस्प्ले मिळणार आहे. याशिवाय 7000 mAhची दमदार बॅटरी पहिल्यांदाच सॅमसंग मोबाईलमध्ये कंपनी लाँच करत आहे. एका ऑनलाइन इव्हेंटमध्ये याला लाँच करण्यात येणार आहे. ज्यांना फोन खरेदी करायचा आहे त्यांनी notify me बटनावर क्लिक करून गॅलेक्सी एम५१ संबंधित अपडेट मिळवू शकता. फोनची वैशिष्ट्ये आधीच समोर आली आहेत. जर्मनीत गॅलेक्सी एम५१ ची किंमत ३६० यूरो म्हणजेच जवळपास ३१ हजार ४०० रुपये आहे. या फोनला दोन रंगात म्हणजेच ब्लॅक आणि व्हाइट रंगात आणले आहे.

ही आहेत फोनची वैशिष्ट्ये:

गॅलेक्सी एम५१ मध्ये ६.७ इंचाचा फुल एचडी प्लस सुपर अमोलेड प्लस इनफिनिटी ओ डिस्प्ले दिला आहे. यात ऑक्टाकोर प्रोसेसर दिला आहे. याच्या नावाची माहिती अद्याप उघड झालेली नाही. परंतु, फोनमध्ये क्वॉलकॉम प्रोसेसर असल्याचे अद्याप स्पष्ट झाले नाही. हा फोन ६ जीबी रॅम व १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिला आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ५१२ जीबी पर्यंत स्टोरेज वाढवता येवू शकतो. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी, १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल, ५ मेगापिक्सलचा डेप्थ आणि ५ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर दिला आहे. हँडसेटमध्ये सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा पंच होल कॅमेरा दिला आहे.

याशिवाय रेडिओ, 4G, LTE सपोर्ट, USB सी टाइप पोर्ट आणि फिंगरप्रिंग सेंसर अशा अनेक सुविधा यामध्ये उपलब्ध आहेत. 25 वॅटचा फास्ट चार्जर ग्राहकांना मिळणार आहे. साधारण 30 ते 40 टक्के फोन चार्ज होण्यासाठी वेळ लागू शकतो त्यानंतर मात्र पटकन चार्जिंग पुढचं होईल असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.