कंगनाच्या मुंबईच्या वक्तव्यावरून वातावरण पेटलं आहे. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात अभिनेत्री कंगना रनोट सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करताना दिसत आहेत. नुकतेच तिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मिरशी केली आहे. यानंतर तिच्यावर टीकेची झोड उठली आहे. मराठी कलाकारांसोबतच बॉलिवूड सेलेब्रिटींनीही तिच्यावर निशाणा साधला आहे. यावरून कंगनाला मुंबईत न येणाचा सल्ला देणाऱ्यांना कंगनाने पुन्हा एक आव्हान दिलं आहे. कुणाच्या बापात हिम्मत असेल तर मला रोखून दाखवा, असं म्हणत कंगनाने आपण ९ सप्टेंबर रोजी मुंबईत येणार असल्याचं सांगितलं आहे.
https://twitter.com/KanganaTeam/status/1301782810261299200?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1301782810261299200%7Ctwgr%5Eshare_3&ref_url=https%3A%2F%2Fzeenews.india.com%2Fmarathi%2Fentertainment%2Fkisi-ke-baap-mein-himmat-hai-toh-rok-le-kangana-ranaut-set-to-return-back-to-mumbai%2F533672
धमकी देणाऱ्यांना कंगनाचं प्रत्युत्तर
कंगनाने ट्विट करत लिहिले की, ‘बरेच लोक मला परत मुंबईला न येण्याची धमकी देत आहेत म्हणून मी आता येत्या आठवड्यात 9 सप्टेंबरला मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला आहे, जेव्हा मी मुंबई विमानतळावर उतरेल तेव्हा टाइम पोस्ट करेल. कुणाच्या बापात दम असेल तर रोखूनच दाखवा’ कंगनाने टीका करणाऱ्यांना चॅलेंज दिलं आहे.
मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची उपमा देणाऱ्या अभिनेत्री कंगना राणौत हिच्यावर सध्या सोशल मीडियावर टीकेचा भडिमार होत आहे. या पार्श्वभूमीवर कंगना राणौत हिने आणखी एक ट्विट करून विरोधकांवर पलटवार केला आहे. या ट्विटमध्ये कंगनाने म्हटले आहे की, तर आता सगळ्या गुंडांची तळपायाची आग मस्तकात केली आहे. ते वैफल्यग्रस्त झाले आहेत पण त्यांच्याकडे मांडायला कोणताही तर्कशुद्ध मुद्दा नाही. त्यामुळे हे सर्वजण माझ्याविषयी आक्षेपार्ह मिम्स तयार करत असून मला नावं ठेवत आहेत.
काय म्हणाली होती कंगना…
कंगनाने महाराष्ट्र पोलिसांबद्दल केलेल्या टीकेवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कंगनाला चांगलेच सुनावले आहे. यासह मुंबईत भीती वाटत असेल तर तिनं परत येऊ नये, असेही राऊत कंगनाला म्हणाले होते. यावरच कंगनाने राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे. हे प्रत्युत्तर देताना पुन्हा एकदा कंगनाने ट्विट केले असून त्यात ती म्हणाली, “शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला धमकी दिली आणि पुन्हा मुंबईत परत येऊ नये असे म्हटले. यापूर्वी मुंबईच्या रस्त्यांवर स्वातंत्र्याच्या घोषणा देण्यात आल्या. आता उघडपणे धमक्या मिळत आहेत. ही मुंबई पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे का वाटत आहे?”