आता नो PUBG; अक्षय कुमारने केली FAU-G गेमची घोषणा

0
488

देशाच्या सुरक्षेसाठी भारताने 118 चाइनीज अ‍ॅप्सवर (chinese app) बंदी घातली. त्यामध्ये भारतात सर्वाधिक पसंतीच्या PUBG गेमचाही समावेश आहे. त्यामुळे पब्जी गेमला काय पर्याय आहे, याचा शोध अनेक जण घेऊ लागले. आता पब्जीप्रेमींसाठी एक खूशबर ती म्हणजे चिनी पब्जीप्रमाणेच आता भारतात FAU-G गेम लाँच होणार आहे. खिलाडी अक्षय कुमारनेच या मेड इन इंडिया गेमची घोषणा केली आहे. हा गेम खेळणाऱ्यांना देशातील जवानांच्या बलिदानाची माहितीदेखील दिली जाईल. हा अक्षय कुमारचा पहिला गेमिंग वेंचर आहे.

अक्षय कुमारने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर याबाबत माहिती दिली आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ या अभियानाला समर्थन देत FAU-G गेम सादर करताना अत्यंत आनंद होत आहे. या गेममध्ये प्लेयर्स मनोरंजन व्यतिरिक्त सैनिकांच्या बलिदानाविषयी माहिती मिळवू शकतील. या गेममधून जे उत्पन्न येईल त्यापैकी 20 टक्के रक्कम भारताच्या ‘वीर ट्रस्ट’साठी दान केलं जाईल”, अशी घोषणा अक्षय कुमारने केली आहे.

भारतात तरुणांमध्ये PUBG या गेमची खूपच क्रेझ आणि लोकप्रियता होती. मात्र, सरकारने या पबजीवर बंदी घातली आहे. या गेमवर आता अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याने पर्याय शोधला आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याने शुक्रवारी आपल्या सोशल मीडिया हँडल्सवरुन एका नव्या अ‍ॅक्शन गेमची घोषणा केली आहे. अक्षय कुमार याने आपल्या ट्वीटर अकाऊंटवरुन मल्टीप्लेअर गेम FAU-G ची घोषणा केली आहे.

हा गेम नेमका कधी लॉन्च होणार तसेच लॉन्चिंगची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीये. मात्र, गेमची घोषणा झाल्याने हा गेम लवकरच लॉन्च होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. आता अक्षय कुमारच्या घोषणेनंतर सोशल मीडियावर लोकांनी फौजीबाबत पॉझिटिव्ह कमेंट्स केल्या आहेत.ट्वीटरवर FAU-G ट्रेंड करत आहे. फक्त एका तासात याबाबत 20 हजारांपेक्षा जास्त ट्वीट्स करण्यात आले आहेत. हा गेम विशाल गोंदालच्या इंडिया गेम्स आणि बंगळुरूच्या एनकोर गेम्सने सोबत मिळून तयार केला आहे.

भारत आणि चीन यांच्यात निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणात केंद्र सरकारने बुधवारी डिजिटल स्ट्राईक करत ११८ वर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. यामध्ये प्रसिद्ध मोबाइल गेम PUBG च्या नावाचाही समावेश आहे. PUBG मोबाइल गेम भारतात गुगल प्ले स्टोअर काढण्यात आला आहे.