कंगनाच्या मदतीला धावून आले केंद्र सरकार; Y श्रेणीची सुरक्षा केली बहाल

0
344

मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतला हिमाचल प्रदेश सरकारनं सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला असतानाच मोदी सरकारकडून Y दर्जाची सुरक्षा देण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. कंगना रानौत आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यात ट्विटरवॉर झाले होतं. यामध्ये संजय राऊतांनी कंगनाला मुंबईत न येण्याचा सल्ला दिला होता. यावर कंगनाने हे चॅलेंज स्विकारून मी ९ सप्टेंबर रोजी मुंबईत येणार असल्याचे सांगितले.

कंगनाने याबाबत ट्विटर करून गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत. हे प्रमाण आहे की, कोणत्याही देशभक्ताचा आवाज रोखला जाऊ शकत नाही. मी अमित शाह यांची आभारी आहे. परिस्थिती पाहता ते मला काही दिवसांनी मुंबईत येण्याचा सल्ला देऊ शकत होते. त्यांनी भारताच्या मुलीने दिलेल्या वचनांचा मान ठेवला. माझ्या स्वाभिमान आणि आत्मसम्मनाची लाज राखली, असं ट्विटर कंगनाने केलं आहे.

https://twitter.com/KanganaTeam/status/1302846165637971969?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1302846165637971969%7Ctwgr%5Eshare_3&ref_url=https%3A%2F%2Fmaharashtratimes.com%2Fentertainment%2Fentertainment-news%2Fbollywood-news%2Fkangana-ranaut-y-security-mumbai-controversy-shivsena-sanjay-raut%2Farticleshow%2F77972286.cms

सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणात कंगना पहिल्या दिवसापासून बॉलिवूड विरोधात बोलत आहे. घराणेशाही, गटबाजी, ड्रग्ज या सगळ्यांवर कंगनाने निर्भीडपणे आपली मतं मांडली आहेत. कंगनाच्या या वक्तव्यांमुळे ती सेलिब्रिटींच्या निशाण्यावर आली. फक्त सेलिब्रिटीच नाही तर राजकीय नेत्यांच्याही निशाण्यावर आली आहे. मुंबईत येतानाच कंगनाला ही सुरक्षा देण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. यासोबतच कंगनाला देण्यात येणाऱ्या व्हाय श्रेणीतील या सुरक्षेत ११ पोलीस सुरक्षा रक्षक आणि एक किंवा दोन कमांडो असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यानंतर अभिनेत्री कंगना राणौतला शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी चांगलेच सुनावले आहे. हा वाद आता अत्यंत टोकाला जावून पोहोचला आहे. शिवाय कंगना आणि संजय राऊत यांच्यातील वाद आणखी चिघळण्याची चिन्ह दिसत आहेत. दरम्यान शिवसेना नेते संजय राऊत यांनी कंगनाप्रती अपशब्द वापरल्यामुळे कंगनाने त्यांना ट्विटरच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं. देशातील मुलगी तुम्हाला माफ करणार नाही, असं म्हणतं तिन राऊतांवर टीका केली आहे.