WorldPhysiotherapyDay: फिजिओथेरपीचं महत्त्व काय आहे?

0
727

सध्या व्यस्त जीवनशैलीमुळे प्रत्येकाचं आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. परिणामी हृदयाचे आजार, मधुमेह, सांधेदुखी तसंच मेंदूचे अनेक आजार जडतात. निरोगी आरोग्यासाठी आधुनिक वैद्यकीय शास्त्राची एक सर्वोत्तम उपचार पद्धती म्हणजे फिजिओथेरेपी. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, फिजिओथेरेपीचे उपचार घेतल्यानंतर अनेक रूग्णांना नवं आयुष्य मिळण्यास मदत होते. फिजिओथेरेपी ही निरोगी आरोग्यासाठी फार उपयुक्त अशी उपचार पद्धती आहे. ८ सप्टेंबर या जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत.

फिजिओथेरपी म्हणजे रुग्णांसोबत मित्रत्वाने राहून त्यांच्या रोगावर योग्य निदान करून त्यांना लवकर बरे करण्यात मदत करणे होय. व्याधीचे मूळ कारण शोधून काढून व्यायामाची शास्त्रीय पद्धतीने जोड देऊन दुखण्यावर मात करण्याची किमया फिजिओथेरपीमध्ये असते.

फिजियोथेरपी एक औषध मुक्त आरोग्य सेवा आहे. पाठदुखी ,कूल्हे, गुडघे, घोट्या, मनगट, कोपर किंवा कंधे यासारख्या दुग्ध वेदनावर फिजीओथेरपिस्ट महत्त्वाची भूमिका बजावतात. हाडांशी निगडित कोणतीही समस्या उद्‌भवली की आपण अगदी सहज हाडांच्या डॉक्‍टरकडे जातो, पण त्याबरोबरच फिजिओथेरपी हाही हाडांच्या समस्यांसाठी एक उत्तम उपाय ठरू शकतो. हल्ली हाडांशी निगडित शस्त्रक्रिया किंवा इतर समस्या उद्‌भवल्या की डॉक्‍टरही फिजिओथेरपी घेण्याचा सल्ला घेतात. यामध्ये कोणतेही औषध न देता केवळ व्यायाम आणि काही उपकरणांच्या साह्याने रुग्णाला आराम मिळेल यासाठी प्रयत्न केले जातात. हे व्यायाम सुरुवातीला तज्ज्ञांकडून शिकवले जातात. मात्र, अनेकदा ते व्यायाम घरच्या घरीही करता येऊ शकतात. त्यामध्ये सातत्य ठेवल्यास त्याचा हाडांच्या समस्यांवर अतिशय चांगला उपयोग होतो.

फिजिओथेरपी ही पॅरालिसिस नंतरचे उपचार, हाडांशी निगडित मोठा अपघात, मेंदूशी निगडित आजार यानंतर अतिशय उपयुक्त ठरणारी एक उत्तम उपचारपद्धती आहे. मात्र, याबाबत आपल्याकडे पुरेशी माहिती नसल्याने त्याचा म्हणावा तितका वापर केला जात नाही. मात्र ही उपचारपद्धती तज्ज्ञांकडून समजावून घेऊन मगच करणे केव्हाही श्रेयस्कर असते. केवळ व्यायाम आहेत म्हणून अपुऱ्या ज्ञानावर ते केल्यास त्याचा शरीरावर दुष्परिणामही होऊ शकतो. दुखावलेले स्नायू, सांधे यांची काळजी घेण्याचे काम फिजिओथेरपीमध्ये केले जात असल्याने खेळाडूंना झालेल्या दुखापतींवरही ही उपचारपद्धती अतिशय उपयुक्त ठरते.

या आजारांवर घ्या फिजिओथेरेपीचे वापर

  • हृदयाचे आजार
  • फुफ्फुसांचे आजार
  • पक्षाघात
  • पाठीचा कणा
  • सांधेदुखी
  • मेंदूचे विकार

फिजिओथेरेपीचे फायदे

  1. वेदना कमी होण्यास मदत होते
  2. शस्त्रक्रिया करावी लागत नाही

कधी करावी ही थेरपी

शरीरावर जेव्हा आणि जेथे दुखणं येतं तेव्हा तेथे फिजिओथेरेपी करून घ्यावी लागते. शस्त्रक्रिया केल्यानंतर जेव्हा सांधे दुखायला लागतात तेव्हा. किंवा पॅरालिसीस झाल्यानंतर ही थेरपी करावी लागते. जेथे अपंगत्व किंवा दुखणं येतं तेथे या थेरपीची गरज आहे. विशेषतः सांधे किंवा स्नायू दुखावतात तेव्हा ही थेरपी करावीच लागते. मुलांना जन्मतःच काही समस्या असेल तर त्यांच्या स्नायूंच्या हव्या तशा हालचाली होत नाहीत. मग त्यांना ट्रेनिंग देण्यासाठी फिजिओथेरपिस्टची गरज असते.