बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनोटच्या मुंबई येथील ऑफिसमध्ये तोडफोड करण्यात आली. पालिकेने सकाळी 11 वाजताच्या सुमारास ऑफिसचे टाळे तोडून कारवाईला सुरुवात केली होती. बीएमसीने तिचे ऑफिस अवैध बांधकाम असल्याची 24 तासांत तिला दुसरी नोटीस पाठवली गेली. मुंबई व मुंबई पोलिसांविरुद्ध वक्तव्य केल्यामुळं कंगना शिवसेनेच्या रडारवर आली होती. मुंबईत भीती वाटत असेल तर स्वत:च्या राज्यात निघून जाण्याचा सल्ला शिवसेनेनं कंगनाला दिला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून कंगनानं शिवसेनेला आव्हान दिलं होतं.
कंगनाच्या जुहू येथील कार्यालयात अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याचा ठपका मुंबई महापालिकेने ठेवला. त्यानंतर कंगनाला नोटीस बजावत अखेर बुधवारी सकाळी मुंबई महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी कारवाई करण्यासाठी तिच्या कार्य़ालयावर पोहोचले. या निमित्ताने कंगनाने ट्विट करत कारवाईवर टीका केली. कंगनाने २ ट्विट केले. “मणिकर्णिका फिल्म्समध्ये पहिला चित्रपट अयोध्येची घोषणा झाली होती. ही माझ्यासाठी इमारत नाही तर राम मंदिर आहे. आज इथे बाबर आला आहे. आज इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. राम मंदिर पुन्हा पाडलं जाईल, पण लक्षात ठेव बाबर… राम मंदिर पुन्हा उभं राहील..जय श्री राम”, असं तिने ट्विट केलं. तसंच दुसऱ्या ट्विटमध्ये मुंबई महापालिकेचे कर्मचारी आणि अधिकारी यांचे काही निवडक फोटो पोस्ट करत त्यांना तिने ‘बाबर आणि त्याची सेना’ असं म्हटलं.
दरम्यान, कंगनाच्या कार्यालयाच्या बांधकामाबाबत तक्रारी आल्या होत्या. त्यांना उत्तर देण्यासाठी मुदत दिली होती. महापालिका सगळ्यांना वेळ देते. अवैध बांधकामावर कारवाई केली नाही तर तुम्हीच बोलणार. ही कारवाई अवैध बांधकामावरच होत आहे. नियमित बांधकामावर होत नाही, अशी प्रतिक्रिया मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी कारवाईबाबत दिली.
https://twitter.com/KanganaTeam/status/1303563425193189376?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1303563425193189376%7Ctwgr%5Eshare_3&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fmumbai-news%2Fkangana-ranaut-tweet-demolition-of-mumbai-manikarnika-office-refers-bmc-officers-babur-and-his-army-uddhav-thackeray-government-sanjay-raut-vjb-91-2270886%2F
https://twitter.com/KanganaTeam/status/1303569152917946368?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1303569152917946368%7Ctwgr%5Eshare_3&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fmumbai-news%2Fkangana-ranaut-tweet-demolition-of-mumbai-manikarnika-office-refers-bmc-officers-babur-and-his-army-uddhav-thackeray-government-sanjay-raut-vjb-91-2270886%2F