पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना आहे तरी काय?

0
233

केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी मागील वर्षी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेतून सरकार शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षाला ६ हजार रुपये देणार आहे. दोन हजार रुपयांच्या हफ्त्याने ही रक्कम दिली जाणार आहे.

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना

  • पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना 1 डिसेंबर 2018पासून देशात लागू करण्यात आली.
  • या योजनअंतर्गत देशातल्या शेतकऱ्यांना प्रतिवर्ष 6 हजार रुपयांचा आर्थिक मदत दिली जाते.
  • पण, मग या योजनेसाठी कोणता शेतकरी पात्र ठरतो, असा प्रश्न आता तुमच्या मनात आला असेल. तर या योजनेसाठी सगळेच शेतकरी अर्ज करू शकतात.
  • सरकारनं सुरुवातीला 2 हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांचा या योजनेत समावेश केला होता. पण, नंतर या योजनेची व्याप्ती वाढवून सगळ्याच शेतकऱ्यांना म्हणजे शेतकऱ्याकडे किती जमीन आहे याचा विचार न करता सगळ्याच शेतकऱ्यांना या योजनेत समाविष्ट करण्यात आलं.
  • या योजनेअंतर्गत प्रतिवर्ष 4 महिन्यांच्या अंतरानं दोन हजार रुपयांचे तीन हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.

पंतप्रधान शेतकरी योजनेसाठी कसा कराल नोंदणी /अर्ज

या योजनेसाठी अर्ज करण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. सर्वप्रथम तुम्ही भारत सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर www.pmkisan.gov.in/ जा. आणि पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी या योजनेसाठी स्वत:च्या नावाची नोंदणी करा. https://www.pmkisan.gov.in/RegistrationForm.aspx येथे शेतकऱ्यांची नोंदणी अर्ज भरणे आणि स्वत:ची नोंदणी करावी. याशिवाय शेतकरी महसूल अधिकारी किंवा पंतप्रधान शेतकरी योजनेसाठी राज्य सरकारद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्याकडे संपर्क करु शकता. किंवा आपल्या जवळील सामान्य सेवा केंद्रा (सीएससी)वर जाऊ शकतात. आणि किमान समर्थन योजनेसाठी अर्ज करु शकता.

पंतप्रधान शेतकरी योजनेसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे

आधार कार्ड.
बँक खाते.
सातबारा उतारा.
रहिवाशी दाखला.
नोंदणी झाल्यानंतर www.pmkisan.gov.in/ या लिंकवर जाऊन अर्ज, देयक, आणि इतर तपशीलाची चौकशी करत रहावी.

पंतप्रधान किसान पोर्टलवर किसान कॉर्नर (शेतकरी कॉर्नर) या पर्यायात खालील अजून काही सुविधा आहेत

नवीन शेतकरी नोंदणी.
आधार कार्ड रिकॉर्ड संपादित करा.
लाभार्थ्यांची स्थिती.
स्व :नोंदणी/ सीएससीची स्थिती.
पीएम किसान अ‍ॅप डाऊनलोड करा.

पंतप्रधान शेतकरी निधी योजनेची स्थिती आणि लाभार्थ्यांची यादीची चौकशी कशी कराल

पंतप्रधान शेतकरी योजनेच्या अधिकृत वेबसाईट – www.pmkisan.gov.in/ वर जा.
मेनू बार वर असलेल्या किसान कॉर्नर (शेतकरी कॉर्नर) वर क्लिक करा.
आता या लिंकवर क्लिक करा ज्यात लाभार्थींची स्थिती आणि लाभार्थी यादी आहे. त्यात तुम्ही चौकशी करू शकता.
जर तुम्ही लाभार्थी यादीची चौकशी करत असाल तर तुम्ही आपले राज्य, जिल्हा, उप- जिल्हा, तालुका आणि गावाचे नाव तेथे टाका.
मग अहवाल मिळवा वर क्लिक करा.

आधार संबंधित दुरुस्ती कशी करायची?

पीएम-किसान योजनेत नाव नोंदवताना आधार कार्डसंबंधीची माहिती चुकली असेल, तर दुरुस्ती करण्यासाठी तुम्हाला फार्मर कॉर्नरमधील Edit Aadhar Failure Record या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

त्यानंतर आधार क्रमांक आणि captcha टाकून सर्च या पर्यायावर क्लिक केलं की एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल.

त्या पेजवर आधार कार्डवर जसं नाव आहे, तसंच तुम्हाला टाकायचं आहे आणि सबमिट म्हणायचं आहे. त्यानंतर तुम्ही केलेली दुरुस्ती तिथं नोंद होईल.