ज्या व्यक्तीवर तुमचं नितांत प्रेम आहे, तो व्यक्ती नैराश्यात असतानाही तुम्ही त्याला ड्रग्स देणार का, असा सवाल अभिनेत्री अंकिता लोखंडेने अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या अटकेनंतर तिला पाठिंबा दर्शविणाऱ्या कलाकारांना केला आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) मंगळवारी अटक केली. रियाच्या अटकेनंतर अनेक बॉलिवूड कलाकारांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिला पाठिंबा दर्शविला. सुशांतची हत्या झाली असं मी कधीच म्हणाले नाही, असं अंकिताने म्हटलं आहे. याविषयी तिने एक मोठी पोस्टदेखील शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणातील मुख्य संशयित आरोपी रिया चक्रवर्तीविषयीदेखील अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.
अंकिता पोस्टमध्ये म्हणते, मी पुन्हा एकदा स्पष्टपणे सांगते, मला सतत प्रसारमाध्यमातून एकच प्रश्न विचारले जात आहेत. सुशांतची हत्या आहे की आत्महत्या? पण सुशांतची हत्या झाली असं मी कधीच म्हटलं नाहीये आणि कोणाला दोषीदेखील म्हटलं नाहीये. मी कायम सुशांतला न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे सत्य हे तपासयंत्रणांच्या माध्यमातून समोर यावं. एक महाराष्ट्रीयन व्यक्ती आणि भारताची नागरिक असल्यामुळे मला महाराष्ट्र राज्य सरकार, पोलीस यंत्रणा आणि केंद्र सरकार यांच्यावर पूर्ण विश्वास आहे”, असं अंकिता म्हणाली.
एकीकडे तिने सांगितले की सुशांतच्या आरोग्यासाठी ती सर्व डॉक्टरांच्या संपर्कात होती आणि दुसरीकडे ती ड्रग्स मिळवण्यासाठीसुद्धा प्रयत्न करत होती. जर एखादी व्यक्ती सांगतेय की मला दुसऱ्या व्यक्तीवर नितांत प्रेम आहे, तर त्या दुसऱ्या व्यक्तीची मानसिक स्थिती माहित असतानाही त्याला अमली पदार्थांचं सेवत करू देणार का? तुम्ही असं करणार का,” असा प्रश्न उपस्थित करत अंकिताने रियावर टीका केली. रियाला एनसीबीने अटक केल्यानंतर देखील अंकिताने सोशल मीडियावर पोस्ट केली होती.
सुशांत ड्रग्ज घेतो हे त्याच्या कुटुंबाला सांगितले होते का?
अंकिताने लिहिले की, ‘तिच्या (रिया) च्या मते, तिने सुशांतच्या कुटुंबीयांना त्याच्या उपचारांबद्दल माहिती दिली होती, पण तिने कधी त्यांना ड्रग्जबद्दल माहिती दिली का? मला खात्री आहे की तिने दिली नाही. कारण तिला स्वतःला अमली पदार्थांचा सेवन करायला मजा येत होती. आणि हेच मला वाटते कर्म/नशीब.’
देशात लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असून केंद्रीय निवडणूक आयोगाने सात टप्प्यातील निवडणूक कार्यक्रम आज जाहीर केला. त्यानुसार १९ एप्रिलपासून देशात लोकसभा निवडणूक होणार असून...
ऑक्टोबर- नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या आगामी टी२० विश्वचषकापूर्वी आंतराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने क्रिकेटच्या नियमात काही मोठे बदल केले जाणार अशी घोषणा केली आहे. यामध्ये स्ट्राईक घेण्यापासून ते डेड बॉल, नो बॉल, पेनल्टी धावांपर्यंत अनेक मुद्यांवर नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. यासोबतच कोविड-१९ च्या काळापासून सुरू झालेली लाळ बंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयसीसीचे नवे नियम 1 ऑक्टोबर 2022 पासून लागू होतील.