दक्षिण आफ्रिकेमध्ये क्रिकेटवर मोठं संकट; क्रिकेट बोर्डावर सरकारी कारवाई

0
247

दक्षिण आफ्रिकेमध्ये क्रिकेटवर मोठं संकट ओढावलं आहे. दक्षिण आफ्रिकेचं क्रिकेट बोर्ड असलेल्या ‘क्रिकेट साऊथ आफ्रिका’वर सरकारी संस्था स्पोर्ट्स कॉन्फेड्रेशन ऍण्ड ऑलिम्पिक कमिटी (SASCOC)ने निलंबनाची कारवाई केली आहे. दक्षिण आफ्रिकेतील ऑलिंपिकशी संबंधित संस्थेने क्रिकेट साउथ आफ्रिका बोर्डाला निलंबित केले आहे. दक्षिण आफ्रिका स्पोर्ट्स अॅण्ड ऑलिंपिक समितीने या कारवाईमुळे दक्षिण आफ्रिकेतील क्रिकेट बोर्डाची प्रतिमा खराब जाली आहे. एवढच नव्हे तर आता आफ्रिकेच्या संघावर आंतरराष्ट्रीय बंदीचे संकट आले आहे.

क्रिकेट बोर्डातील कारभारात आलेला नकारात्मकपणा आणि काही प्रशासकीय कामांमुळे ही कारवाई करण्यात आलेली आहे. दक्षिण आफ्रिकेचं भविष्यातील क्रिकेट अधिक उज्वल व्हावं यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याची माहिती SASCOC चे रवी गोवेंदर यांनी दिली. काही महिन्यांपूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाचे थबांग मोरोए यांच्या बेबंद कारभारामुळे क्रिकेट बोर्डावर चांगलंच संकट ओढावलं होतं. ज्यानंतर थबांग मोरोए यांना तात्काळ पदावरुन हटवण्यात आलं. सरकारी कारवाईनंतर क्रिकेट बोर्डातील सर्व अधिकाऱ्यांना आपलं पद सोडावं लागणार आहे. SASCOC या प्रकरणी एका टास्क फोर्सची स्थापना करणार असून हा टास्क फोर्स महिन्याभराच्या कालावधीत क्रिकेट बोर्डाच्या कारभाराची चौकशी करुन अहवाल सादर करणार आहे.

जागतिक क्रिकेटवर नियंत्रण ठेवणाऱ्या आयसीसी च्या नियमानुसार कोणत्याही क्रिकेट खेळणाऱ्या देशातील क्रिकेटचे कामकाज पाहणारी स्वतंत्र संस्था हवी. सरकार अथवा अन्य संस्थेचे त्यावर थेट नियंत्रण असता कामा नये. गेल्या काही दिवसापासून आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डात अंतर्गत वाद सुरू आहे. यामुळे सरकारने क्रिकेट बोर्डाला निलंबित केले आणि त्याचे व्यवस्थापन स्वत:च्या ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे दक्षिण आफ्रिकेच्या संघावर मान्यतेची टांगती तलवार आहे.

दक्षिण आफ्रिकन कंफेडरेशन अॅण्ड ऑलिंपिक कमिटीने क्रिकेट दक्षिण आफ्रिकेला पत्र लिहून याबाबत कळवले आहे. बोर्डातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रशासनातून बाहेर पडण्यास सांगितले आहे. गेल्या डिसेंबरपासून बोर्डात अनेक चूकीच्या यात गैरव्यवहार आणि वर्णद्वेष या गोष्टींचा समावेश असल्याचे त्यांनी म्हटले आहे. बोर्डात सुरू असलेल्या गोष्टींची चौकशी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

याआधी आफ्रिकेच्या संघावर २१ वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बाहेर बसण्याची वेळ आली होती. त्यानंतर १९९१ साली त्यांनी पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला. वर्णद्वेषामुळे आफ्रिकेवर बंदी घातली होती. तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या सरकारने असे काही नियम तयार केले होते ज्यामुळे बंदी घातली गेली.