मराठी पाऊल पढते पुढे ;व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये मराठी चित्रपटाची छाप

0
271

आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रपट महोत्सवांपैकी महत्त्वाच्या व प्रतिष्ठित असलेल्या व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यंदा मराठी चित्रपटसृष्टीसाठी ‘चैतन्य’दायी ठरला आहे. आशय आणि विषय या दोन्हीबाबती सरस असलेल्या मराठी चित्रपटानं आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यास भाग पाडलं आहे. तब्बल २० वर्षांनंतर भारतीय चित्रपट व्हेनिस चित्रपट महोत्सवात पोहोचला होता. महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब म्हणजे हा चित्रपट मराठी आहे. दरम्यान, या चित्रपटानं भारताच्या आणि महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. ७७ व्या आंतरराष्ट्रीय व्हेनिस चित्रपट महोत्सवात FIPRESCI च्या ‘इंटरनॅशनल क्रिटिक्स’ या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. चित्रपट महोत्सवाची सांगता होण्यापूर्वीच ही आनंदाची बातमी समोर आली आहे.

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या व्हेनिस चित्रपट महोत्सवामध्ये तब्बल २० वर्षांनंतर एका भारतीय चित्रपटाची निवड झाली तसेच अभिमानाची गोष्ट म्हणजे हा चित्रपट मराठी आहे. मराठी चित्रपट दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे याचा ‘द डिसायपल’ या चित्रपटाची व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील स्पर्धा विभागात निवड करण्यात आलीये. जगातील सर्वात महत्त्वाच्या तीन फिल्म फेस्टीव्हलमध्ये व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलची गणना होते. २०२०च्या या महोत्सवात निवड झालेल्या इतर चित्रपट दिग्दर्शकाच्या नामावलीकडे नुसती नजर टाकली तरी चैतन्याच्या कामगिरीचा आपल्याला अभिमान वाटू लागतो.

‘कोर्ट’ या आपल्या पहिल्याच चित्रपटाच्या दिग्दर्शनातून चैतन्यनं चित्रपटसृष्टीवर आपली छाप सोडली होती. ‘द डिसायपल’ हा त्या त्याचा चित्रपट व्हेनिस चित्रपट महोत्सवाच्या स्पर्धा विभागात दाखवण्यात आला. हा चित्रपट भारतीय शास्त्रीय संगीतावर आधारित आहे. तसंच शास्त्रीय गायक आदित्य मोडक हे या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. अतोनात प्रेम आणि कष्टानं हा चित्रपच तयार केला आहे. आता कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटतं, अशी प्रतिक्रिया यापूर्वी चैतन्यनं दिली होती.