जया बच्चन यांचा रवीकिशनवर अप्रत्यक्ष निशाना; कंगनाने जया बच्चनवर केला उलटवार

0
273

समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन राज्यसभेत भाजप खासदार रवी किशन यांच्यावर नाव न घेता बरसल्या. मनोरंजन विश्वाचा भाग असलेल्या लोकसभा खासदाराने (ड्रग्जच्या मुद्द्यावरुन) इंडस्ट्रीविरोधात केलेले भाष्य लज्जास्पद असल्याचे त्या म्हणाल्या. रवी किशन यांनी लोकसभेत इंडस्ट्रीतील कलाकारांकडून ड्रग्स सेवनाचा मुद्दा उपस्थित केला होता आणि त्याविषयी चौकशीची मागणी केली होती. यावरूनच “ज्या ताटात खातात, त्याच ताटात नंतर छेद करतात”, अशा शब्दांत जया बच्चन यांनी टीका केली. यावर कंगना म्हणाली की तुमचा मुलगा जर फासावर अटकला असता तर तुम्ही असे वक्तव्य केले असते? तर रवी किशन म्हणाले की, जयजींकडून अशी अपेक्षा नव्हती.

जया बच्चन नक्की काय बोलल्या ?

चित्रपटसृष्टीतील अंमली पदार्थांच्या वापराचा मुद्दा खासदार रवी किशन यांनी सोमवारी लोकसभेत उपस्थित केला होता. त्याला राज्यसभेच्या शून्य प्रहरात उत्तर देताना जया बच्चन म्हणाल्या की ‘सरकारने मनोरंजन विश्वाच्या पाठीशी उभे राहायला पाहिजे, कारण मनोरंजन विश्वच नेहमी सरकारच्या मदतीला येते. एखादी राष्ट्रीय आपत्ती आल्यास ते पुढे येतात, पैसे देतात, सेवा बजावतात. काही जणांमुळे संपूर्ण इंडस्ट्रीची प्रतिमा मलीन करणे चुकीचे आहे” असे जया बच्चन म्हणाल्या. मनोरंजन विश्वामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव आणि ओळख मिळते, पण मनोरंजन विश्वाचा भाग असलेल्या लोकसभा खासदाराने फिल्म इंडस्ट्रीविरोधात भाष्य केले. याची मला अत्यंत लाज वाटली.

रवीकिशन यांची यावर प्रतिक्रिया:-

दरम्यान, जयाजींनी माझ्या बोलण्याला पाठिंबा द्यावा अशी माझी अपेक्षा होती, अशी प्रतिक्रिया भाजप खासदार रवी किशन यांनी दिली. “मनोरंजन विश्वातील प्रत्येक जण ड्रग्ज घेत नाहीत, परंतु जे घेतात ते जगातील सर्वात मोठा चित्रपट उद्योग संपवण्याच्या योजनेचा एक भाग आहेत. जयाजी आणि मी जेव्हा इंडस्ट्रीत आलो, तेव्हा परिस्थिती अशी नव्हती. पण आता आपल्याला तिचे संरक्षण करण्याची आवश्यकता आहे” असेही ते म्हणाले.

कंगनाने जया बच्चनला केला प्रश्न :-

जयाजी, जर माझ्या जागी तुमची मुलगी श्वेतासोबत किशोरवयात मारहाण, ड्रग्ज देणे आणि विनयभंग झाला असता तर तुम्हीही असेच म्हणाला असतात का? अभिषेकने सतत गुंडगिरी आणि छळवणूक झाल्याबद्दल तक्रार केली असती, आणि एक दिवस तो लटकलेल्या अवस्थेत आढळला असता, तर आपण असेच बोलला असता काय? आमच्या सारख्या कलाकारासोबतही तुमची सहानुभुती ठेवत जा.

https://twitter.com/KanganaTeam/status/1305742115255668736?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1305742115255668736%7Ctwgr%5Eshare_3&ref_url=https%3A%2F%2Fdivyamarathi.bhaskar.com%2Fnational%2Fnews%2Fjaya-bachchan-vs-kangana-ranaut-samajwadi-party-mp-jaya-bachchan-on-kangana-ranaut-127721023.html

ह्या प्रतिक्रिया कशामुळे उमटल्या?

रवी किशन यांनी लोकसभेत काय म्हटले होते?

सोमवारी भाजप खासदार रवी किशन यांनी लोकसभेत ड्रग्ज आणि बॉलिवूड कनेक्शनचा मुद्दा उपस्थित केला होता. ते शून्य तासाच्या दरम्यान म्हणाले की, पाकिस्तान आणि चीनमधून ड्रग्सची तस्करी केली जात आहे. देशातील तरुण पिढी उद्ध्वस्त करण्याचा हा कट आहे. ते म्हणाले की ते आपल्या चित्रपटसृष्टीत शिरले आहे आणि एनसीबी त्याचा तपास करीत आहे. ते म्हणाले की, माझी मागणी आहे की या संदर्भात कठोर कारवाई केली जावी.