दुनिया हिला देंगे हम: आयपीएलसाठी मुंबई इंडियन्स सज्ज

0
457

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे IPL २०२० भारतामध्ये होत नसून ती दुबई येथे होणार आहे, पण यावर्षीची IPL ची ट्रॉफी कोण स्वतःच्या नावावर करेल काही सांगितल्या जात नाही, पण प्रत्येक संघ हा २०२० च्या IPL साठी सज्ज आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वांच्या नजरा मुंबई इंडियन्सकडे असणार आहे. एकमेव अशी टीम ज्यांनी आपल्या नावावर ४ वेळा आयपीएल किताब जिंकण्याचा पराक्रम केला आहे.

आयपीएलच्या मागच्या मोसमातील चॅम्पियन मुंबई इंडियन्स यंदाही तशीच कामगिरी करण्यासाठी मैदानात उतरेल. नेहमीप्रमाणेच यावेळीही मुंबईच्या टीममध्ये अनेक दिग्गज खेळाडू आहे. मुंबई इंडियन्सची फलंदाजी नेहमीप्रमाणे मजबूत आहे. मात्र, लसिथ मलिंगा तसंच स्पिनर्सच्या कमतरतेमुळे जेतेपद जिंकण्याचं आव्हान असणार आहे. मुंबईचे आठ सामने अबू धाबीच्या धीम्या खेळपट्ट्यांवर होणार आहे.

कर्णधार रोहित शर्मा आणि दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डिकॉक ओपनर म्हणून मुंबईची ताकद आहेत. तर ऑस्ट्रेलियाचा क्रिस लिनही गरज पडली तर ओपनिंगसाठी पर्याय आहे. दुसरीकडे सूर्यकुमार यादव, कायरन पोलार्ड, हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या यांच्यासारखे बॅट्समन मधली फळी तगडी बनवण्यात मदत करतील.

गत वर्षी अंतिम लढतीत मुंबईला शेवटच्या षटकात विजय मिळवून देणारा लसिथ मलिंगाने वैयक्तिक कारणांमुळे यंदा स्पर्धेतून माघार घेतली आहे. मलिंगाची उणीव मुंबईला नक्की भासेल. मात्र मुंबईकडे जसप्रीत बुमराह आणि धवल कुलकर्णीलाही मुंबईने टीममध्ये सामील केलं आहे.

परदेशी फास्ट बॉलरमध्ये मुंबईकडे ट्रेन्ट बोल्ट आणि मिचेल मॅकलॅनघन डावखुऱ्या बॉलरचा पर्याय आहेत. तर ऑस्ट्रेलियाच्या नॅथन कुल्टर नाईलचा फास्ट बॉलिंग ऑलराऊंडर म्हणूनही वापर केला जाऊ शकतो. मलिंगाच्याऐवजी ऑस्ट्रेलियाचा जेम्स पॅटिनसन टीममध्ये आला आहे. त्यामुळे फास्ट बॉलरसाठी मुंबईकडे बरेच पर्याय आहेत.

यासोबतच मुंबईकडे हार्दिक पांड्या आणि कायरन पोलार्ड हे फास्ट बॉलिंग ऑलराऊंडर आहेत. कायरन पोलार्डने नुकत्याच संपलेल्या कॅरेबियन प्रिमियर लीग (सीपीएल)मध्ये उल्लेखनीय बॉलिंग केली आहे. सीपीएल फायनलमध्ये पोलार्डने चार विकेट घेऊन ट्रिनबागो नाईट रायडर्सला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

आतापर्यंत सर्वाधिक ४ वेळा आयपीएल जिंकणाऱ्या मुंबईकडे यंदा चांगल्या स्पिनरची कमतरता आहे. मुंबईकडे काम चलाऊ स्पिनर म्हणून कृणाल पांड्या आहे, तर मागच्या मोसमात चांगली कामगिरी करणारा लेग स्पिनर राहुल चहर यंदाही तशीच कामगिरी करेल, अशी मुंबईची अपेक्षा असेल. ऑफ स्पिनर जयंत यादवसाठी मागचा स्थानिक मोसम चांगला गेला नाही, पण जयंत यादवला यंदा स्वतःला सिद्ध करण्याची चांगली संधी आहे.

मुंबईचा संघ

रोहित शर्मा (कर्णधार), दिग्विजय देशमुख, क्विंटन डि कॉक, आदित्य तारे, सौरभ तिवारी, जसप्रीत बुमराह, धवल कुलकर्णी, नाथन कोल्टर-नाइल, ट्रेंट बोल्ट, जयंत यादव, सूर्यकुमार यादव, कृणाल पांड्या, किरोन पोलार्ड, लसिथ मलिंगा, राहुल चाहर, क्रिस लिन, हार्दिक पांड्या, शेरफेन रदरफोर्ड, अनमोलप्रीत सिंह, मोहसिन खान, मिचेल मॅकक्लिंघन, प्रिंस बलवंत राय सिंह, अनुकूल राय, इशान किशन.