Happy Birthday PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रेरणादायी प्रवास

0
390

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज जन्मदिवस आहे. १७ सप्टेंबर १९५० रोजी नरेंद्र मोदी यांच्या जन्म गुजरातच्या वडनगरमध्ये झाला होता. पंतप्रधान मोदींचा बालपणापासूनच संघाकडे ओढ होता. ते गुजरातमधील आरएसएसचा मजबूत आधारस्तंभ होते. वयाच्या १७ व्या वर्षी ते अहमदाबादला आले आणि त्याचवर्षी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य झाले. त्यानंतर १९७४ साली नवनिर्माण आंदोलनात ते सहभागी झाले. अनेक वर्ष ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते.

मोदींनी किशोर वयात आपल्या भावासमवेत चहाचे दुकान चालविले. तरुणपणी महाविद्यालयीन शिक्षण घेतांनाच ते संघाचे पूर्ण वेळ प्रचारक बनले. १९९१ मध्ये कन्याकुमारी-श्रीनगर एकता यात्रेपासून त्यांचा राजकारणात उदय झाला. १९९५ मध्ये भाजपाचे राष्ट्रीय सचिव म्हणून त्यांनी पाच राज्यांची जबाबदारी निभावली. २००१ ते २००२ व नंतर २००२ ते २००७ तसेच २००७ ते २०१२ या काळात गुजरातचे मुख्यमंत्री. भाजपतर्फे त्यांचे सप्टेंबर २०१३ मध्ये पंतप्रधानपदाचे भावी उमेदवार म्हणून घोषणा झाली.

पंतप्रधान मोदींच्या राजकीय प्रवासावर एक नजर…
गुजरातचे मुख्यमंत्री ते देशाचे पंतप्रधान असा नरेंद्र मोदी यांचा प्रवास आहे. नरेंद्र मोदी यांनी 26 मे 2014 रोजी भारताचे चौदावे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती. बालपणापासूनच त्यांचा ओढा संघाकडे होता आणि गुजरातमध्ये आरएसएसचा मजबूत आधारही तेच होते. 1967 मध्ये वयाच्या 17 वर्षी ते अहमदाबादला आले आणि त्याच वर्षी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य बनले. यानंतर 1974 मध्ये ते नवनिर्माण आंदोलनात सहभागी झाले. अशाप्रकारे सक्रिय राजकारणात येण्याआधी नरेंद्र मोदी अनेक वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे प्रचारक होते.

2001 मध्ये पहिल्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री बनले!
2001 मध्ये केशुभाई पटेल यांना मुख्यमंत्रीपदावरुन हटवल्यानंतर नरेंद्र मोदी यांच्याकडे गुजरातचं नेतृत्त्व सोपवण्यात आलं. डिसेंबर 2002 च्या विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी विजय मिळवला होता. यानंतर 2007 च्या विधानसभा निवडणुका आणि मग 2012 मध्येही नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात भाजपने गुजरातमध्ये निवडणुका जिंकल्या. त्यांच्याच कार्यकाळात गोध्रा जळीतकांडही घडलं होतं.

2014 मध्ये पहिल्यांदा पंतप्रधानपदी विराजमान
तर 2014 मध्ये ते देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले. एकट्या भाजपने 282 जागांवर विजय मिळवला होता. एवढंच नाही तर उमेदवार म्हणून मोदींनी वाराणसी आणि वडोदरा या दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि दोन्ही मतदारसंघात त्यांचा विजय झाला. मात्र 2019 मधील लोकसभा निवडणुकीतील विजय 2014 पेक्षा फारच मोठा होता. या निवडणुकीत भाजपने तब्बल 303 जागांवर विजय मिळवला. 30 मे 2019 रोजी त्यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली.

मोदींनी महिला, मुलं, ज्येष्ठ नागरीक, व्यापारी, शेतकरी, युवा या सर्व वर्गांच्या हीताला समोर ठेऊन अनेक योजनांची सुरुवात केली. भारतात स्वच्छता अभियानाची सुरुवात करून लोकांमध्ये स्वच्छते प्रती जागरूकता निर्माण केली. पीएम पदाची जवाबदारी सांभाळल्या नंतर नरेंद्र मोदींनी एका मागोमाग एक विदेश दौरे करत भारताचे संबंध इतर देशांशी मजबूत करण्याचे प्रयत्न केले. सोबतच विदेशी व्यवसायांना भारतात गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहित केलं.

शिक्षण, स्वास्थ्य, सुरक्षा, परिवहन, रस्ते, मनोरंजन, यांसारख्या क्षेत्रात मोदींनी अनेक कामं केलीत. या व्यतिरिक्त मेक इन इंडिया आणि डिजीटल इंडिया सारख्या कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकांना जागरूक केलं. आपल्या सकारात्मक विचारांनी आणि विकसनशील कार्याने त्यांनी जनतेच्या मनात आवडता प्रधानमंत्री म्हणून आपली छाप सोडली आणि याचा परिणाम त्यांना 2019 च्या निवडणुकांमध्ये मिळाला.

2019 च्या निवडणुकांमध्ये अभूतपूर्व यश मिळवून बनले दुसऱ्यांदा पंतप्रधान-
एक सक्षम आणि सशक्त प्रधानमंत्री म्हणून आपली छाप सोडणाऱ्या नरेंद्र मोदींनी 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा पीएम पदाच्या उमेदवारी सोबत निवडणूक लढली आणि या वेळी त्यांची जादू कमाल करून गेली. 542 जागांपैकी 353 जागांवर विजयश्री मिळवून त्यांनी 70 वर्ष जुन्या कॉंग्रेस पार्टीला धारातीर्थी पाडले आणि आपल्या रणनीतीने 2019 च्या निवडणुकीत इतिहास रचला आणि म अश्या तऱ्हेने भारताला नरेंद्र मोदींच्या रुपात प्रधानमंत्री नव्हे तर प्रधानसेवक मिळाला.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा जनतेचा विश्वास संपादन करून दुसऱ्यांदा पीएम पद प्राप्त केलं, आणि ते सतत देशातील जनतेच्या विकासाकरता कार्यरत आहेत.

नरेंद्र दामोदरदास मोदी भारतीय राजकारणातील तो चेहरा आहे ज्यांनी अवघ्या काही वर्षांमध्ये देशातील राजकारणाची अवघी परिभाषाच बदलून टाकली. त्यांच्या राजकीय रणनीती पुढे सारा विपक्ष धारातीर्थी पडला शिवाय जगापुढे ग्लोबल लीडर म्हणून स्वतःची प्रतिमा निर्माण करण्यात देखील ते यशस्वी झाले. यामुळेच आज जनता मोदींकडे एका नायकाच्या रूपाने पहाते आहे केवळ मोदीच असे राजकीय नेता आहेत ज्यांना विदेशात देखील मोठ्या प्रमाणात सन्मान दिला जातो.

नरेंद्र मोदींना मिळालेले सन्मान – 

  • 2005 साली मोदींना भारताच्या विज्ञान आणि प्रौद्योगिकी विभागा द्वारे एलीटेक्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • 2007 मध्ये मोदींना इंडिया टुडे मैगजीन तर्फे देशातील सर्वश्रेष्ठ मुख्यमंत्री म्हणून गौरविण्यात आलंय.
  • 2009 या वर्षी नरेंद्र मोदींना FDI मैगजीन तर्फे पर्सनालिटी ऑफ द ईयर पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • 2014 ला फोर्ब्स च्या यादीत मोदींचे नाव विश्वातील सर्वात शक्तिशाली लोकांमध्ये 15 व्या स्थानावर होते
  • 2014 लाच टाइम पत्रिके द्वारे नरेंद्र मोदींना 100 सर्वात प्रभावशाली लोकांच्या यादीत शामिल करण्यात आले.
  • 2014, 2015, आणि 2017 ला टाइम मैग्जीन तर्फे मोदींना जगातील 100 सर्वात प्रभावशाली लोकांमध्ये सहभागी करण्यात आले आहे.
  • फोर्ब्स मैग्जीन ने 2015, 2016, 2018 ला देखील नरेंद्र मोदींना 9 सगळ्यात शक्तिशाली लोकांमध्ये सहभागी केले.
  • सप्टेंबर 2018 ला मोदींना युनाइटेड नेशन चा सर्वोच्च पर्यावरण सन्मान चैम्पियंस ऑफ अर्थ अवॉर्ड देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला
  • 24 ऑक्टोबर 2018 ला आंतरराष्ट्रीय सहयोग आणि ग्लोबल आर्थिक विकासाला प्रोत्साहन देण्याकरता मोदींना सिओल शांती पुरस्कार देण्यात आला.
  • 2018 साली मोदींना भारत आणि फिलीस्तीन यांच्यातील नातं मजबूत केल्याबद्दल सर्वोच्च फिलीस्तिनी सन्मान “फिलीस्तिनी राज्याचे ग्रेंड कॉलर” ने गौरविण्यात आलं.
  • 22 फेब्रुवारी 2019 मध्ये मोदींना प्रतिष्ठित सिओल शांती पुरस्कार 2018 बहाल करण्यात आला.