BIRTHDAY SPECIAL : प्रिया बापट यांचा आज वाढदिवस

0
515

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बापटचा आज वाढदिवस. अनेक मालिका, नाटक आणि सिनेमांमध्ये झळकलेल्या प्रियाने काही हिंदी सिनेमांमध्येसुद्धा काम केले आहे. चुलबुली प्रियाला धमाल-मस्ती करणे पसंत आहे. आज मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिची गणना केली जाते. सहावीत असताना प्रियानं सिनेसृष्टीत पदार्पण केलं. जब्बार पटेल यांचा ‘बाबासाहेब आंबेडकर’ हा तिचा पहिला चित्रपट. तर, नववीत असताना तिनं ‘वाटेवरती काचा गं…’ या नाटकात काम केलं होतं.

प्रियाने चित्रपट, नाटक, मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये काम केले आहे. नवा गडी नवं राज्य या नाटकात तसेच अधुरी एक कहानी, शुभंकरोती, दे धमाल, आभाळमाया यांसारख्या मालिकांमधील तिच्या भूमिकांचे कौतुक झाले आहे. प्रिया खूप चांगली अभिनेत्री आहे हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. पण त्याचसोबत ती आणखी एका कलेत पारंगत आहे. ती एक खूपच चांगली गायिका असून तिने गायनाचे शिक्षण देखील घेतले आहे. शुभदा दादरकर यांच्याकडून तिने दोन वर्षं नाट्य संगीताचे धडे गिरवले आहेत. तसेच प्रसिद्ध शास्त्रीय गायिका उत्तरा केळकर यांच्याकडून देखील तिने गायन शिकले आहे. तसेच शिवाजी पार्क विद्यालयात देखील तिने शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले आहेत. प्रियाचा आवाज खूपच छान असून तिचा आवाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडतो.

‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय” या प्रचंड गाजलेल्या चित्रपटात त्यांनी सचिन खेडेकर यांच्या मुलीची भूमिका केली होती. २०१३ साली आलेला महेश मांजरेकर दिग्दर्शित ”काकस्पर्श” हा चित्रपट त्यांच्या करियरला कलाटणी देणारा ठरला. त्यात प्रिया बापट यांनी बालविधवेची भूमिका केली होती. त्यानंतर ”टाईम प्लीज”, “आंधळी कोथिम्बीर”, “हैप्पी जर्नी “, “लोकमान्य एक युग पुरुष” आणि ” टाईम पास २” असे यशस्वी चित्रपट त्यांनी दिले आहे. या सर्वच चित्रपटात त्यांच्या अभिनयाचे व लूकचे कौतुक झाले. वेबसीरिज या नव्या क्षेत्रातही प्रियानं आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. ‘सिटी ऑफ ड्रिम्स’, ‘आणि काय हवं’ या वेबसीरिजमधील तिच्या कामाचं कौतुक झालं. ऑलराऊंडर असणारी प्रिया बापट हिने निर्मिती क्षेत्रातही आपले पाऊल ठेवले असून दादा एक गुड न्यूज आहे हे तिचे निर्मिती क्षेत्रातले पहिले नाटक आहे.