मोबाईल प्रेमींसाठी खुशखबर; मोटो रेजर फोल्डेबल फोन झालाय स्वस्त

0
276

मोटोरोलाचा फोल्डेबल फोन Moto Razr खरेदी करायचा विचार करीत असाल तर तुमच्यासाठी ही जबरदस्त संधी आहे. कंपनीने नवीन नवीन Moto Razr 5G स्मार्टफोनला लाँच केल्यानंतर गेल्यावर्षी लाँच केलेल्या Moto Razr फोनची जबरदस्त कपात केली आहे. महेश टेलिकॉमच्या एका रिपोर्टच्या माहितीनुसार, कंपनीने गेल्या वर्षीच्या मोटो रेजरच्या किंमतीत ३० हजार रुपयांची कपात केली आहे.

मोटो रेजर स्वस्त झाल्याची माहिती महेश टेलिकॉमने आपल्या ट्विटर हँडलवरून दिली आहे. ट्विटच्या माहितीनुसार, मोटो रेजर २०१९ फोन आता ९४ हजार ९९ रुपयांना झाला आहे. आधी या फोनची किंमत १ लाख २४ हजार ९९९ रुपये होती.

मोटो रेजर काय आहे खास:-
फोनमध्ये 21:9 चे आस्पेक्ट रेशियो सोबत ६.२ इंचाचा फ्लेक्सिबल ओलेड डिस्प्ले दिला आहे. या डिस्प्ले मध्ये हिंज लावलेला आहे. याच्या मदतीने फोन फोल्ड होतो. नोटिफिकिशन्स वाचण्यासाठी फोनच्या बाहेरच्या बाजुला एक सेकंडरी डिस्प्ले दिला आहे. या डिस्प्ले द्वारे युजर फोन विना अनफोल्ड करून गुगल असिस्टेंटचा वापर करू शकतो. फोनमध्ये दिलेल्या दोन्ही डिस्प्ले कॉर्निंग गोरिला ग्लास ३ प्रोटेक्शनसोबत येतो.

६ जीबी रॅम आणि १२८ जीबीच्या इंटरनल स्टोरेजच्या या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन प्रोसेसर दिले आहे. फोन अँड्रॉयड ९ आउट ऑफ द बॉक्स ओएसवर चालतो. फोटोग्राफिसाठी या फोनमध्ये लेजर ऑटोफोकस सोबत १६ मेगापिक्सलचा मेन कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी फोनच्या फ्रंटमध्ये ५ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 2510mAh बॅटरी दिली आहे. १५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करते.