पल्स ऑक्सिमीटर म्हणजे काय? ते कशाप्रकारे काम करते?

0
720

एव्हाना बर्‍याच लोकांपर्यत कोरोनाची लागण झाल्यास या रोगाची तीव्रता जोखण्यासाठी पल्स ऑक्सिमीटर हे उपकरण कामी येऊ शकतं ही माहिती पोहोचली आहे. आजकाल ऑफिस असो वा सरकारी कार्यालय येथे पल्स ऑक्सिमीटर हे उपकरण हमखास बघायला मिळते. तर हे पल्स ऑक्सिमीटर आहे तरी काय आणि ते का वापरले जात आहे याबद्दल आपण माहिती घेणार आहोत.

काय आहे पल्स आक्सिमीटर?

पल्स ऑक्सिमीटर ही एक प्रकारची चाचणी असते. पल्स ऑक्सिमीटर मध्ये आपलं बोट ठेवायचं असतं आणि त्यानंतर लगेचच त्यावर काही नंबर दाखवले जातात. या चाचणीमध्ये रुग्णाला कोणतीही दुखापत किंवा वेदना होत नाहीत. ही वस्तू आपल्या शरीरातील ऑक्सिजनची मात्रा मापण्यास मदत करते. तसेच पल्स डिव्हाईस आपल्या शरीरात झालेल्या छोट्यात छोट्या बदलाचीही माहिती देते. हे एका छोट्याश्या क्लिपसारकं डिव्हाईस असतं. ऑक्सिजनचा बरोबर नंबर मिळवण्यासाठी पल्स ऑक्सिमीटरमध्ये आपल्याला बोट ठेवायचं असतं. त्यानंतर हे पल्स ऑक्सिमीटर आपल्या रक्तातील ऑक्सिजनची मात्रा मापतं. ते आपल्या ह्रदयाच्या ठोक्यांचे रिडींग देखील देते. थोडक्यात सांगायचे म्हटले तर पल्स ऑक्सिमीटर pulse oximeter म्हणजे एक छोटंसं मशीन जे आपल्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी दाखवतं.

  • पल्स ऑक्सिमीटर हे थम इम्प्रेशन प्रमाणेच एक मशीन आहे.
  • यात बोट ठेवल्यानंतर माणसाच्या शरीरात रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कळते.
  • जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरात रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण हे 95 ते 100 दरम्यान असेल तर ते साधारण मानलं जातं.
  • याचा अर्थ त्या व्यक्तीला कोरोना झालेला नाही.
  • मात्र जर एखाद्याच्या शरीरात रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण हे 94 किंवा त्याहून कमी असेल तर त्याला संशंयित समजलं जातं.

पल्स ऑक्सिमीटर वापरायचं कसं ?
आपल्या शरीरातील आक्सिजनची मात्रा मोजण्यासाठी पल्स ऑक्सिमीटचा वापर केला जातो. ऑक्सिमीटरमध्ये बोट ठेवून काही सेकंदात त्याच्या स्क्रीनवर आपल्याला शरीरातल्या ऑक्सिजनचं प्रमाण दिसतं. बोटाला कोणत्याही प्रकारची इजा अथवा वेदना यामध्ये होत नाही. डॉक्टर रिचर्ड लेवीटन यांनी पल्स ऑक्सिमीटर, कोरोनाची गंभीरता जोखण्यासाठी कसं उपयुक्त आहे याबात न्यूयॉर्क टाइम्समध्ये एक लेख लिहिला होता. इमर्जन्सी मेडिसिनमध्ये गेली तीस वर्ष काम करणारे डॉक्टर रिचर्ड लेवीटन यांनी या लेखात म्हटल्याप्रमाणे निरोगी लोकांमध्ये पल्स ऑक्सिमीटर चे रिडींग हे 95 ते 98 टक्के असं असतं. जर रुग्णाच्या शरीरातलं ऑक्सिजनचं प्रमाण 92 -94 टक्क्यांच्या खाली असेल तर डॉक्टरांशी बोलून, रुग्णाला मग इस्पितळात भरती करण्याची गरज आहे की नाही हे ठरवावं. जो पर्यंत शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण हे 95 च्या वर आहे, श्वास घेण्यास विशेष अडचण नसेल तर कोरोना योग्य वैद्यकीय उपचारांनी घरच्या घरी बरा होऊ शकतो.

फुफ्फुसासाठी दिलेलं औषध किती चांगल्या पद्धतीने काम करतंय हे समजण्यासोबतच कोणाला श्वास घेण्यास अडथळा येत असल्यास ते देखील समजते. म्हणजेच श्वासाशी निगडीत अनेक प्रकारची माहिती मिळवण्यासाठी हे उपकरण लाभदायक आहे.