नवरात्र आणि दसरा सण यंदा साधेपणाने साजरा करा-मुख्यमंत्र्यांचं आवाहन

0
291

राज्यात करोना संसर्गाचा प्रादुर्भाव अद्याप कायम आहे. स्थिती अद्यापही नियंत्रणात आलेली नाही. ही गोष्ट लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रत्येक पाऊल अगदी सावधपणे टाकत असून सर्वधर्मीयांचे सण तसेच उत्सवांच्या बाबतीतही त्यांनी तेच धोरण पत्करले आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्र आणि दसरा सण देखील साधेपणाने साजरा करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केलं आहे. याबाबत परीपत्रकही काढण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्र, दसरा साधेपणाने साजरे करा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना केलं आहे.

दरम्यान, येत्या 17 ते 25 ऑक्टोबरदरम्यान नवरात्र, दूर्गापूजा, विजयादशमी सण साजरा होणार आहेत. लोकांनी गर्दी न करता गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रोत्सवही साधेपणाने साजरा करावा. कोरोनासंदर्भातील शासनाने जारी केलेल्या सूचना, मार्गदर्शन, दक्षता यांचे पालन करावे. जेणेकरुन आपण सर्वजण सर्वांच्या सहभागातून कोरोनाचा प्रसार रोखू शकतो, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

लोकांनी गर्दी न करता गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रोत्सवही साधेपणाने साजरा करावा. करोनासंदर्भातील शासनाने जारी केलेल्या सूचना, मार्गदर्शक तत्वे यांचे काटेकोरपणे पालन करावे. मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन, स्वच्छता या सर्व बाबींची काळजी घ्यावी, जेणेकरुन आपण सर्वजण सर्वांच्या सहभागातून करोनाचा प्रसार रोखू शकू, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी पुढे नमूद केले आहे.

कोरोनाची लढाई आक्रमकपणे सुरू

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत झालेल्या 7 राज्यांच्या मुख्यमंत्र्याच्या बैठकीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग घेतला. माझे कुटुंब , माझी जबाबदारीसारख्या मोहिमेच्या माध्यमातून आम्ही कोरोना विरुद्धची लढाई अधिक आक्रमकपणे लढतोय. आमच्या प्रयत्नांचा परिणाम येणाऱ्या दिसून येईल. पुढील काळात मृत्यूदर आणि कोविड पॉझिटिव्हिटी दर कमी झालेला आपल्याला दिसेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत सांगितले. राज्यात सर्वत्र टेलीआयसीयू व्यवस्था उभारून ग्रामीण भागातील रुग्णांना वेळीच उपचार कसे मिळतील हे आम्ही पाहणार आहोत असेही ते सांगितले. कोविडनंतर देखील रुग्णांमध्ये वैद्यकीय उपचारांची गरज असून उपचार केंद्रे सुरु करणार आहोत अशी माहिती त्यांनी दिली.