ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज आणि प्रसिद्ध समालोचक डीन जोन्स यांचे गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते. IPLमधील एक प्रसिद्ध समालोचक म्हणून भारतीय चाहते जोन्स यांना ओळखायचे. गुरूवारी दुपारच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले.
डीन जोन्स हे सक्रिय क्रिकेट विश्लेषक होते. सध्या युएईमध्ये सुरूअसलेल्या आयपीएलमध्ये टेलिव्हिजनवर समालोचन करण्यासाठी स्टार स्पोर्ट्ने त्यांच्याशी करार केला होता. जोन्स हे भारतीय प्रसारमाध्यमांतील एक लोकप्रिय व्यक्ती होत. त्यांचा ‘प्रोफेसर डिनो’ हा एनडीटीव्हीवरील कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय होता. ते जगभरातील विविध लीगमध्ये समालोचन करत. जोन्स आपल्या स्पष्ट व परखड टिप्पण्यांसाठी प्रसिद्ध होते. जोन्स सध्या आयपीएल समालोचनाच्या निमित्तानं मुंबईत होते. काल रात्री कोलकाता-मुंबई सामन्यात जोन्स यांचं समालोचन होतं.
डीन जोन्स हे ऑस्ट्रेलियाच्या दिग्ग्ज खेळाडूंमध्ये ओळखले जातात. त्यांनी 52 टेस्ट, 164 वनडे इंटरनॅशनल सामने खेळले आहेत. टेस्टमध्ये 216 आणि वनड मध्ये 145 रन त्यांचा सर्वोत्कृष्ट स्कोर आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये 46.55 च्या रनरेटने त्यांनी 3631 रन केले आहेत ज्यामध्ये 1 शतक आणि 14 अर्धशतकांचा समावेश आहे.
वनडेमध्ये त्यांनी 44.61 च्या रनरेटने 6068 रन केले आहे. ज्यामध्ये 7 शतक आणि 46 अर्धशतकांचा समावेश आहे. जोन्स यांनी टेस्टमध्ये 34 आणि वनडेमध्ये 54 कॅच पकडले आहेत. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्यांनी 245 सामन्यांमध्ये 19,188 रन केले आहेत. त्यांनी नाबाद 324 रनची सर्वोत्कृष्ट खेळी केली होती.
80 च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि 90 च्या दशकाच्या प्रारंभी डीन जोन्सला जगातील सर्वोत्तम वन डे फलंदाजांपैकी एक मानले जात असे. फिरकीपटू आणि वेगवान गोलंदाज या दोघांविरूद्ध तो सर्वोत्कृष्ट फलंदाज होता. विकेट्स दरम्यान धावण्याच्या बाबतीत तो आश्चर्यकारक मानला जात असे. 2019 मध्ये त्याला ऑस्ट्रेलिया क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये स्थान देण्यात आले होते.
“डीन मर्व्हिन जोन्स यांचे आज निधन झाले. अचानक गुरूवारी त्यांना हृदयविकाराच्या झटका आणि त्यांचा मृत्यू झाला. आम्ही त्याच्या कुटूंबियांबद्दल तीव्र संवेदना व्यक्त करतो. देव त्यांच्या कुटुंबीयांना या कठीण परिस्थितीत दु:ख पचवण्याची शक्ती देवो. जोन्स यांच्याबाबत आवश्यक ती व्यवस्था करण्यासाठी आम्ही ऑस्ट्रेलियन उच्चायुक्तांशी संपर्क साधत आहोत”, असे स्टार इंडियाने पत्रकात स्पष्ट केले.
डीन जोन्स हे एक ‘चॅम्पियन’ समालोचक होते. त्यांच्या समालोचनाच्या खेळकर शैलीने त्यांनी अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य खुलवले.
Really shocking to lose a colleague and a dear friend – Dean Jones. Gone so young. Condolences to the family and may his soul rest in peace #RIPDeanJones 🙏 – @cricketcomau pic.twitter.com/pckNBow5Sv
— Ravi Shastri (@RaviShastriOfc) September 24, 2020