RR vs KXIP : राजस्थान जिंकली; भारतीय युवा चेहरे चमकले

0
226

आयपीएलमध्ये आज रविवारी किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals Vs Kings Xi Punjab) यांच्यात चांगलीच लढत रंगली. पंजाब कडून मयांक अग्रवाल आणि लोकेश राहुलने अप्रतिम फलंदाजी केली तर राजस्थान रॉयलकडून संजू सॅमसन, स्टीव्ह स्मिथ आणि राहुल तेवातीया यांनी आक्रमक फलंदाजी करत राजस्थान विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. नाणेफेक जिंकत राजस्थानचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबने दिलेल्या 224 धावांच्या आव्हानाचा पाठलाग राजस्थाननं 4 विकेट्सने मात केली.आजच्या सामन्याचे वैशिष्ट्य म्हणजे भारतीय युवा फलंदाजांनी चांगली कामगिरी बजावली.

पंजाबकडून मयांक अग्रवालचे अप्रतिम शतक

मयांकने आपले शतक केवळ 45 चेंडूंमध्ये पूर्ण केले. या शतकी खेळीमध्ये मयांकने 9 चौकार आणि 7 षटकार लगावले. यावेळी, त्याचा स्ट्राइक रेट 222.22 होता. यासह, मयांक आयपीएलमधील वेगवान शतक ठोकणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे.

आयपीएलमधील सर्वात वेगवान शतक झळकावण्याचा विक्रम युसुफ पठाणच्या नावावर आहे. पठाणने आयपीएल 2010 मध्ये अवघ्या 37 चेंडूत शतक ठोकले होते. आता या यादीत मयांक दुसर्‍या क्रमांकावर आला आहे.

राजस्थानकडून संजू सॅमसन आणि राहुल तेवातीयाची आकर्षक फटकेबाजी:

राजस्थान राॅयल्सच्या विजयात संजु सॅमसन आणि राहुल तेवाटियाचे माेलाचे याेगदान राहिले. सॅमसनने सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक साजरे केले. त्याने आता ८५ धावांची खेळी केली. सॅमसनने 42 चेंडूंमध्ये सात षटकार आणि चार चौकारांच्या मदतीने 85 धावा केल्या आणि राजस्थानला विजयाच्या जवळ आणण्याचे काम केले.

राजस्थानला जिंकण्यासाठी 18 चेंडूंमध्ये 51 धावांची गरज होती. अशातच 21 चेंडूंमध्ये 14 धावांवर खेळणाऱ्या राहुल तेवतियाने शेल्डन कॉटरेलच्या एका ओव्हरमध्ये पाच षटकार लगावले. राहुल तेवातियानं जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर 30 चेंडूत 7 षटकार लगावत 53 धावा केल्या आणि राजस्थानला विजय निश्चित झाला.

संजू सॅमसन, केएल राहुल, स्टिव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, जोफ्रा आर्चर या खेळडूंच्या खेळीवर समस्त क्रिकेट प्रेमींच्या नजरा होत्या. दोन्ही संघांनी प्रत्येकी एक विजय मिळवला असल्याने दुसरा विजय कोणता संघ मिळवणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर राजस्थान रॉयल्स संघाने विजय मिळवला