बर्थडे स्पेशल: गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचा आज वाढदिवस

0
395

भारताचा आवाज अशी ओळख असलेल्या गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचा आज वाढदिवस. बॉलिवूडसह देशविदेशातील विविध भाषांतील गाण्यांना आपल्या मोहक आवाजाने स्वरबद्ध करणाऱ्या लतादिदी आज 91 वर्षांच्या झाल्या आहेत. २८ सप्टेंबर १९२९ साली त्यांचा मंगेशकर कुटुंबात जन्म झाला. मराठी संगीतातील प्रसिद्ध मास्टर दीनानाथ मंगेशकर हे त्यांचे वडील. लता दीदींनी ९८० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, वीसहून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केले आहे.

लता मंगेशकरांचे कुटुंब संगीतासाठी प्रसिद्ध असून, सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची सख्खी भावंडे आहेत.

लतादीदींनी गायिका होण्यापर्यंतच्या प्रवासासोबत अन्य क्षेत्रासुद्धा काम केले आहे. वयाच्या 5 व्या वर्षापासून त्यांनी वडीलांच्या संगीत नाटकात अभिनय करायला सुरुवात केली. त्याचबरोबर 1945 साली आलेल्या मास्टर विनायक यांच्या पहिल्या सिनेमात ‘बडी माँ’ या हिंदी सिनेमातही त्यांनी लहानशी भूमिका साकारली होती.

लता मंगेशकर यांची गाणी आजवर जरी ऐकली तरीही अंगावर शहारे येतात. तर 1942 साली आलेल्या ‘किती हसाल’ सिनेमात त्यांनी पहिले गाणे गायले. गाण्याचे बोल होते- ‘नाचू या गडे, खेळू सारी मनी हौस भारी.’ पण शेवटी ते गाणे सिनेमातून कट करण्यात आले. त्यानंतर त्याच वर्षी त्यांनी ‘पहिली मंगळागौर’ सिनेमात ‘नटली चैत्राची नवलाई’ हे गाणे गायले आणि ते त्यांच्या करिअरमधील पहिले गाणे ठरले. दीदींनी माता एक सपूत की ‘दुनिया बदल दे तू हे हिंदी भाषेतील पहीले गाणे गजाभाऊ (1943) या मराठी चित्रपटासाठी गायले.

  • 1947 साली दीदींना ‘आपकी सेवी में’ या चित्रपटासाठी पार्श्वगायनाची संधी मिळाली.
  • 1949 साली ‘महल’ चित्रपटातील ‘आयेगा आनेवाला’ या गाण्यापासून दीदींना प्रसिध्दी मिळाली.
  • मधुबालापासून माधुरी दीक्षितपर्यंत त्यांनी सर्व नायिकांना आपल्या आवाजावरती ठेका धरायला लावला.
  • 1990च्या दशकापासून ते आतापर्यंत त्यांनी त्यांच्या आवाजाने लोकांच्या मनात छाप पाडलीय.
  • ‘अजीब दास्ताँ है ये’, ‘लग जा गले’, ‘दिल तो पागल है’, ‘जिया जले’, ‘न्ना की तमन्ना है’ यासारखी अनेक प्रसिध्द गाणी दीदींनी गायली आहे.

लतादीदींच्या गाण्याने सर्व लोकांवर एक वेगळीच जादू केली आहे. आपल्या स्वर्गीय स्वरांमधून त्यांनी चाहत्यांच्या मनावर कायमचा ठसा उमटवला आहे. लतादीदींनी या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यासाठी त्यांना भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण, दादासाहेब फाळके आणि कितीतरी असे अनेक पुरस्कार लताजींनी आपल्या जीवनात गाण्याच्या माध्यमातून मिळवले आहेत. आजची पीढीसूद्धा लतादीदींचं गाणं गुणगुणत असते. लता दीदींनी आजवर 30 पेक्षा जास्त भाषांमध्ये गाणी गायली आहेत. सर्वात जास्त गाणी गाण्याचा गिनीज बुक रेकॉर्डही लता मंगेशकर यांच्या नावावर आहे. लता दीदींच्या आजवरच्या कारगिरीला सलाम म्हणून सरकारनेही 2001मध्ये त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्नने सन्मानित केलं