World Heart Day 2020: जागतिक हृदय दिन आणि त्याची काळजी

0
852

आज वर्ल्ड हार्ट डे. यानिमित्ताने एकच काळजी घ्या. हृदयाच्या समस्या टाळण्यासाठी निरोगी जीवनशैलीचे पालन करणे महत्त्वाचे आहे. २९ सप्टेंबर रोजी दरवर्षी जागतिक हृदयदिन (वर्ल्ड हार्ट डे) म्हणून जगभर साजरा केला जातो. कुणालाही आणि कोणत्याही वयात हृदयविकार होऊ शकतो. त्यासाठी सर्वांना प्रतिबंधात्मक उपाययोजना करायला हव्यात. नुकत्याच करण्यात आलेल्या सर्वेक्षणात असे समोर आले आहे की, महिलांच्या तुलनेत पुरुष अधिक तणावाखाली असतात. ८० टक्के पुरुष तर ७४ टक्के महिला तणावाखाली असल्याचे धक्कादायक वास्तव्य समोर आले आहे.

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात अनेक जण त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. यात हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाणही दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसून येत आहे. वयाच्या २२-२३ वर्षाच्या तरुणांमध्येही समस्या जाणवत असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे या समस्येकडे वेळीच लक्ष दिलं पाहिजे. दर वर्षी जगभरात कोट्यवधी लोक हृदयविकारामुळे मृत्यू पावतात. केवळ वृद्धच नाही तर तरूणही हृदयाशी संबंधित आजारांना बळी पडत आहेत. लोकांची बदलती जीवनशैली याला कारणीभूत ठरू शकते. आपली शारीरिक क्रियाकलाप शून्य झाली आहे आणि जंक फूड ही अन्नाची पहिली पसंती बनली आहे त्यामुळे आज ‘वर्ल्ड हार्ट डे’च्या निमित्ताने हृदयरोगाला दूर ठेवायचं असेल तर कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे ते जाणून घेऊयात.

कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे:

  • तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे हृदयाच्या धमक्यांवर परिणाम होतो. यामुळे धुम्रपान आणि मदयपानाचे सेवन करणे टाळावेत.
  • योगासने करा.
  • शक्यतो शाकाहारी जेवण करण्यावर भर द्या.
  • नियमित व्यायाम करा.
  • योग्य पद्धतीचा आणि सकस आहार घ्या.
  • ताजी फळे, भाज्या, बिया आणि सुकामेवा खा.
  • सतत एका जागी बसून काम करु नका. त्यामुळे स्थुलता येते आणि अनेकदा हृदयावर त्याचा परिणाम होतो.
  • सायकलिंग, चालणे, धावणे यासारखे व्यायाम प्रकार करा.
  • कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करावा.

हृदयविकाराची प्रमुख कारणे –

१. हृदयाला रक्तपुरवठा योग्य पद्धतीने न झाल्यास हा आजार होऊ शकतो.

२. पौष्टिक आहाराचा अभाव

३.अयोग्य जीवनशैली

४.धुम्रपान व मद्यपान करण्याची सवय

५. लठ्ठपणा

६.अतिताणतणाव

७. व्यायामाचा अभाव

हृदयविकार असणाऱ्या रुग्णांनी चालू असणारी औषधे आपणहून बंद करु नयेत.अती श्रम टाळावेत.भांडणे करु नयेत म्हणजे टेंशन वाढणार नाही.पथ्य करावेत.ईसीजी,इको,स्ट्रेस टेस्ट,ॲन्जिओग्राफी,ॲन्जिओप्लास्टी, बायपास सर्जरी करावी लागेल की नाही हे तज्ञ डॉक्टर ठरवतील त्याप्रमाणे करणे आवश्यक असते.चालढकल अंगाशी येऊ शकते.

हृदयरोग होण्यासाठी निश्चित वय नाही, तो कोणत्याही वयात येऊ शकतो. यासाठी वयाची तीस वर्षे पूर्ण होताच हृद्याची तपासणी करून घ्यायला हवी. त्यात रक्तदाब, कोलेस्टेरॉल आणि मधुमेहाचीही तपासणी होती. अशी तपासणी दरवर्षी करायला हवी. आजच्या “जागतिक हृदय दिनाच्या” आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आपले हृदय निरोगी राहण्यासाठी काळजी घेण्याची नम्र विनंती !