गुगलकडून खास डुडलद्वारे ज्येष्ठ भारतीय अभिनेत्री जोहरा सेहगल यांना मानवंदना

0
315

अभिनेत्री जोहरा सेहगल (Zohra Segal) यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकणारी पहिली भारतीय अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. 29 सप्टेंबर 1946मध्ये जोहरा यांचा ‘नीचा नगर’ हा चित्रपट कान्स चित्रपट महोत्सवात झळकला होता. 9 सप्टेंबर 1946मध्ये जोहरा यांचा ‘नीचा नगर’ हा चित्रपट कान्स चित्रपट महोत्सवात झळकला होता. इतकेच नव्हे तर या चित्रपटाने कान्स चित्रपट महोत्सवातील ‘द पाल्म डी’ओर’ या मानाच्या पुरस्कारावर आपले नाव कोरले होते. याच दिवसाच्या स्मरणार्थ, आज (29 सप्टेंबर) गुगलने खास डुडलद्वारे जोहरा सेहगल यांना मानवंदना दिली आहे.

गुगलने डुडलच्या माध्यमातून दिवंगत भारतीय अभिनेत्री जोहरा सेहगल यांचा गौरव केला आहे. जोहरा सेहगल यांची नृत्य मुद्रा दाखवणारे डुडल पार्वती पिल्लई यांनी तयार केले आहे.जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण करणाऱ्या आणि ठसा उमटवणाऱ्या पहिल्या काही भारतीय कलाकारांपैकी एक असणाऱ्या अभिनेत्री आणि नृत्यांगना जोहरा सेहगल यांच्या कार्याचा या माध्यमातून गौरव करण्यात येत आहे.

जोहरा सेहगल यांच्याबद्दल:

जोहरा यांनी त्यांचं शिक्षण क्वीन मॅरी कॉलेजमधून पूर्ण केलं. कॉलेजमध्ये असताना त्यांना ‘पर्दा’ ठेवणं सक्तीचं होतं. जर्मनीतील मॅरी विगमॅन बॅले स्कूलमध्ये अॅडमीशन मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला होत्या. तीन वर्ष जोहरा यांनी इथे बॅले डान्स शिकला. एका कार्यक्रमामध्ये त्यांची ओळख भारतातील प्रसिद्ध नर्तक उदय शंकर यांच्याशी झाली. परदेशा भारतीय मुलीची पारंपारिक नृत्याकडे असलेली ओढ पाहून उदय शंकर यांना आनंद झाले. देशात परत गेल्यावर त्यांनी जोहरा यांच्यासाठी काम पाहण्याचं वचन दिलं.

जोहरा सहगल यांननी १९४५ मध्ये ४०० रुपये महिन्याच्या मानधनावर पृथ्वी थिएटरमध्ये काम करायला सुरुवात केली. यानंतर जवळपास १४ वर्ष त्यांनी थिएटरमध्ये काम केलं. या काळात त्यांनी देशातील प्रत्येक शहर पाहिलं होतं. पृथ्वी थिएटरसोबत जोहरा या इप्टाच्याही सक्रिय सदस्य होत्या. पृथ्वी थिएटर’मधून त्यांनी अभिनेत्री म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्या उत्कृष्ट नृत्यांगना होत्या. ‘इप्टा’मुळेच चेतन आनंद यांचा ‘नीचा नगर’ हा चित्रपट जोहरा यांच्या वाट्याला आला होता. चित्रपटांमध्ये आल्यानंतरदेखील त्यांनी रंगभूमी सोडली नव्हती. वयाच्या पंचाहत्तरीनंतर त्यांनी ‘दिल से’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘चीनी कम’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘वीर-जारा’ आणि ‘सांवरिया’ या चित्रपटांमध्ये अविस्मरणीय भूमिका साकारल्या.

जोहरा सेहगल यांना मिळालेले पुरस्कार:

  • 1963: संगीत नाटक अकादमी
  • 1998: पद्मश्री
  • 2001: कालिदास पुरस्कार
  • 2002: पद्मभूषण
  • 2004: संगीत नाटक अकादमी फेलोशिप
  • 2010: पद्मविभूषण