शाओमीने लाँच केली Mi 10T स्मार्टफोन सीरीज; जाणून घ्या फीचर्स

0
285

प्रसिद्ध स्मार्टफोन मेकर कंपनी Xiaomiने Mi 10T स्मार्टफोन सीरीज लाँच केली आहे. यामध्ये कंपनीने Mi 10T, Mi 10T Pro आणि Mi 10T Lite हे स्मार्टफोन लाँच केले आहेत. हे दोन स्मार्टफोन लाँच केले आहे. हे दोन्ही फोन्स कंपनीचे फ्लैगशिप स्मार्टफोन्स आहेत. Mi 10T, Mi 10T Pro कंपनीचे फ्लॅगशीप स्मार्टफोन आहेत. ज्यात शाओमीचे Mi 10 आणि Mi 10 Pro स्मार्टफोनची जागा घेतली आहे. दोन्ही स्मार्टफोनमध्ये पंचहोल डिझाईन आहे. दोन्ही फोनमध्ये फरक आहे. मी १० टी मध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. तर मी १० टी प्रोमध्ये १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. तिन्ही फोन ५ जी सपोर्ट करतात.

फोनची किंमत
Mi 10T दोन व्हेरियंटमध्ये येते. याच्या 6GB + 128GB व्हेरियंटची किंमत 499 यूरो (जवळपास 43,000 रुपये) आणि 8GB + 128GB व्हेरियंट ची किंमत 549 यूरो (जवळपास 47,200 रुपये) आहे. याच प्रमाणे Mi 10T Pro च्या 8GB + 128GB व्हेरियंटची किंमत 599 यूरो (जवळपास 51,700 रुपये), 8GB + 256GB व्हेरियंटची किंमत 649 यूरो (जवळपास 56,000 रुपये) आहे. तर, Mi 10T च्या 6GB + 64GB व्हेरियंटची किंमत 279 यूरो (जवळपास 24,000 रुपये) आणि 6GB + 128GB व्हेरियंटची किंमत 329 यूरो (जवळपास 28,300 रुपये) आहे

Mi 10T स्पेसिफिकेशन्स –
Mi 10T या स्मार्टफोन्सला 6.67 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे.
रिफ़्रेश रेट 144Hz इतका आहे.
इस स्मार्टफोन्समध्ये Qualcomm Snapdragon 865 प्रोसेसर दिला आहे.
हा स्मार्टफोन 8GB रॅम आणि 6GB रॅम अशा दोन व्हेरिएंटमध्ये आहे.
हा स्मार्टफ़ोन Android 10 बेस्ड MIUI 12 वर चलणार आहे.
Mi 10T मध्ये ट्रिपल रियर कॅमरा देण्यात आला आहे.
प्रायमरी सेंसर 64 मेगापिक्सलचा आहे तर सेकेंडरी सेंसर 13 मेगापिक्सलचा आहे.
सेल्फीसाठी 20 मेगापिक्सलचा कॅमेर देण्यात आला आहे.
5,000mAh ची बॅटरी
फिंगरप्रिंट स्कॅनर

Mi 10T Pro स्पेसिफिकेशन्स आणि फिचर्स

6.7 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले
रिफ़्रेश रेट 144Hz
गोरिल्ला ग्लास 5 चं प्रोटेक्शन
ट्रिपल रियर कॅमरा सेटअप
प्रायमरी सेंसर 108 मेगापिक्सल
सेल्फीसाठी 20 मेगापिक्सलचा लेन्स
5,000mAh ची बॅटरी
फिंगरप्रिंट स्कॅनरऐवजी साइड माउंटेड फ़िंगरप्रिंट स्कॅनर

Mi 10T Lite स्पेसिफिकेशन्स

6.67 इंचाचा डिस्प्ले
120Hz रिफ़्रेश रेट
Qualcomm Snapdragon 750G प्रोसेसर
6GB रॅम
4,820mAh बॅटरी
ट्रिपल रियर कॅमरा
प्रायमरी लेंस 8 मेगापिक्सल
सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा लेन्स