Indian Air Force 2020: भारतीय हवाई दल वर्धापनदिन विशेष

0
568

भारतीय हवाई दलाचा आज 88वा स्थापना दिवस आहे. 8 ऑक्टोबर 1932 रोजी भारतीय हवाई दलाची स्थापना झाली होती. भारतीय वायुसेना ही भारतीय संरक्षण दलांच्या पाच मुख्य विभागांपैकी एक असून तिच्यावर भारताच्या वायुक्षेत्राचे रक्षण करण्याची व भारतासाठी हवाई युद्ध करण्याची जबाबदारी आहे. भारतीय हवाई दल जगातल्या पहिल्या पाच उत्कृष्ट दलातील एक मानले जाते.यावेळी एकीकडे एलएसीवर चीनसोबत तणाव सुरु असतानाच गाझियाबादमधील हिंडन एअरबेसवर वायुसेनेची ताकद अवघ्या जगाला दिसेल. स्थापना दिवसाच्या कार्यक्रमात यंदा एकूण 56 विमानांचा सहभाग आहे. यामध्ये राफेल, सुखोई, मिग29, मिराज, जॅग्वार, तेजस विमानांचा समावेश आहे. यावेळी हिंडन एअरबेसवर थरारक प्रात्यक्षिके पाहायलं मिळतील. राफेल लढाऊ विमान हे यंदाचं प्रमुख आकर्षण आहे.

हवाई दल दिनानिमित्त गाझियाबादमधील हिंडन एअरबेसवर हवाई दलाची ताकद पाहायला मिळणार आहे. येथील आयोजित कार्यक्रमात यंदा एकूण 56 विमानांचा सहभाग आहे. यामध्ये राफेल, सुखोई, मिग29, मिराज, जॅग्वार, तेजस विमानांचा समावेश आहे. यावेळी हिंडन एअरबेसवर थरारक प्रात्यक्षिके पाहायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे राफेल लढाऊ विमान हे यंदाचे खास आकर्षण आहे.

हवाई दल संघटनेबद्दल:

हवाई दलाचे मुख्यालय दिल्ली येथे असून त्याचे प्रमुख एअर चीफ मार्शल असतात. त्यांना मदतनीस म्हणून एअर मार्शल दर्जाचे काही उच्चाधिकारी काम पाहतात. हवाई दलाचे विभाजन समादेशांत (कमान्ड्ज) केलेले असून त्यांचे समादेश क्षेत्र प्रक्रियावादी आवश्यक बाबींवर (भौगोलिक) आधारित असते. प्रत्येक हवाई दल समादेशावर एक एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ (एओसीआय्सी) प्रमुख असतो. त्याच्या हाताखाली प्रशिक्षित कर्मचारी वर्ग असतो. समादेश हवाई दलाचा स्वयंभू-सुविधा असणारा सर्वांत मोठा विभाग असून त्याचे कार्यानुसार विंग, युनिट, स्टेशन अशा छोट्या कनिष्ठ शाखांमध्ये पुन्हा विभाजन केलेले असते. त्यांवर विंग कमांडर ते एअर व्हाइस मार्शल दर्जाचा अधिकारी कार्यक्षेत्र आणि भूमिकेबरहुकूम प्रमुख असतो. या उड्डाण विशिष्ट रचनाक्षेत्रात (विंग वा स्टेशन) अनेक विमान स्क्वॉड्रन्स असून ते भूमिका, भौगोलिक स्थळ आणि आवश्यकता यांवर अवलंबून असते. या उड्डाण विशिष्ट रचनाक्षेत्रांवर विंग कमांडरपासून ग्रुप कॅप्टन दर्जाचा प्रत्येकी एक अधिकारी प्रमुख असतो. मूलभूत लढाऊ दल हे फायटर स्क्वॉड्रन असते. सामान्यतः त्यात सोळा विमाने आणि दोन भरारी पथके (फ्लाइट) असतात. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या खालच्या दर्जाचा अधिकारी (फ्लाइट कमांडर) असतो.

  • ‘नभ:स्पृशं दीप्तम्।‘ हे भारतीय हवाई दलाचे ध्येयवाक्य आहे. या वाक्याचा भाषांतर वैभवाने आकाश स्पर्श करा असे होते. भारताचे भूतपूर्व राष्ट्रपति राधाकृष्णन् यांनी हवाई दलाचे ध्येयवाक्य म्हणून हे वाक्य सुचविले.
  • दिल्लीमध्ये भारतीय हवाई दलाचे एक संग्रहालय आहे. स्थापनेपासून आत्तापर्यंतच्या हवाई दलाबद्दलच्या अनेक आठवणी या संग्रहालयाच्या माध्यमातून जतन करुन ठेवण्यात आल्या आहेत.
  • सद्याच्या काळात आधुनिक रडार यंत्रणा, क्षेपणास्त्रे, दळणवळण यंत्रणा, नेटवर्क सेंट्रिक वॉरफेअर सी-४ आय ही संगणक प्रणाली भारतीय हवाई दलाकडे आहे.
  • हवेतल्या हवेत इंधन पुरवठा करणारी विमाने, विमानातून रडार वापरून दूर अंतरावरील शत्रूच्या विमानांची टेहळणी करणारी यंत्रणा, कक्षेबाहेरील शत्रूच्या ठिकाणाचा वेध घेणारी यंत्रणा असणारी विमाने अशी अत्यंत आधुनिक शस्त्रास्त्रे भारतीय हवाई दलाकडे आहेत. राफेलचाही समावेश झाला असल्याने भारतीय हवाई दलाची ताकद चांगल्याप्रकारे वाढली आहे.