पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना विरोधात जनआंदोलन छेडणार वायरसपासून वाचण्यासाठी स्वत:ला आणि कुटुंबाला वाचवण्यासाठी पंतप्रधानांकडून शपथ दिली जाणार आहे. देशात ६७ लाखाहून अधिक जण कोरोना वायरसच्या संपर्कात आलेयत. पण यातून बरे होणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे. हिवाळा आणि त्यात आलेल्या सणांमध्ये कोरोना वेग वाढू नये यासाठी पंतप्रधान जनतेला आवाहन करणार आहे. मास्क वापरणे, दोन फुटांचे अंतर आणि सतत हात धुवण्याचा संदेश पंतप्रधान देणार आहेत.
कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या ८५.०२ टक्क्यांवर पोहोचलीय. पंतप्रधानांच्या नव्या मोहिमेतून १३५ कोटी भारतीयांना कोरोना विरोधात लढण्याची शपथ दिली जाईल. देशवासिय कोरोनापासून स्वत: आणि कुटुंबाचा बचाव करण्याची शपथ घेतील.
सध्या करोना विषाणूवर कोणतीही लस नाही. अशावेळी काळजी घेणे हाच यावरील ठोस आणि कार्यक्षम उपाय आहे. याचेच भान देशातील जनतेला राहिलेले नाही. त्याचीच आठवण करूं देण्यासाठी मोदीजी याला जनआंदोलनचे स्वरूप देण्यासाठी हा शपथविधी कार्यक्रम राबवणार आहेत. सावधानता बाळगावी म्हणून हिवाळ्याच्या कालावधीत नागरिकांनी अधिक सतर्क राहणं आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी फलक लावले जातील. बस स्थानक, विमानतळ यांसारख्या ज्या ज्या ठिकाणी लोकं संपर्कात येतात, अशा ठिकाणी हे फलक लावण्यात येणार आहेत.”
https://t.co/qtwgs15x2D?amp=1