वरुणचा ‘कूली नं. १ येणार या दिवशी भेटीला; अक्षय कुमारचा लक्ष्मी बॉम्ब चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित

0
507

गोविंदाच्या ‘कुली नंबर १’ या चित्रपटाने नव्वदच्या दशकात बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. दिग्दर्शक डेव्हिड धवन यांनी या चित्रपटाची लोकप्रियता पाहाता त्याचा रिमेक करण्याचा निर्णय घेतला होता. अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री सारा अली खान या रिमेकमध्ये मुख्य भूमिकेत आहे.

नुकताच वरुण धवनने ट्विट करत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख घोषीत केली आहे. ‘कुली नं. १ हा चित्रपट येत्या ख्रिसमसला अॅमोझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे’ असे त्याने म्हटले आहे. हा चित्रपट यापूर्वी १ मे २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. हा चित्रपट आता २५ डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे.

१९९५ साली प्रदर्शित झालेल्या ‘कुली नंबर १’ या चित्रपटाचा हा रिमेक आहे. अभिनेता गोविंदा आणि आभिनेत्री करिश्मा कपूर यांनी या चित्रपटात मुख्य व्यक्तिरेखा साकारली होती. नव्या चित्रपटात वरुणसोबत अभिनेत्री सारा अली खान देखील झळकणार आहे.

https://twitter.com/Varun_dvn/status/1314436679218860033?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1314436679218860033%7Ctwgr%5Eshare_3&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fmanoranjan-news%2Fsara-ali-khan-and-varun-dhavan-movie-coolie-no-1-release-date-avb-95-2297597%2F

अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित हॉरर कॉमेडी चित्रपट ‘लक्ष्मी बॉम्ब’ दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री कियारा अडवाणी अक्षयसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सध्या सोशल मीडियावर चित्रपटाबाबत चर्चा सुरु आहेत.

अक्षय कुमारने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लक्ष्मी बॉम्ब चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. ३ मिनिटे ४० सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये अक्षय कुमार एक वेगळ्याच लूकमध्ये दिसत आहे.

येत्या दिवाळीमध्ये लक्ष्मी बॉम्ब हा चित्रपट ९ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या दिवशी हा चित्रपट ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि यूएई या देशातही प्रदर्शित करण्यात येणार आहे. तर भारतीय प्रेक्षकांना हा चित्रपट डिझनी प्लस हॉटस्टावर पाहता येणार आहे.

https://www.instagram.com/tv/CGHRVv9nUdu/?utm_source=ig_embed