SRHvsRR: सामन्यात तेवतिया आणि खलीलमध्ये वाद; विजयानंतर रियानचा अनोखा डान्स

0
292

दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रविवारी खेळल्या गेलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2020) 13 व्या सीजनच्या 26 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने सनरायझर्स हैदराबादला पाच गडी राखून पराभूत केले. राजस्थानकडून राहुल तेवतिया आणि रियान परागने अखेरच्या षटकात बाजी पलटवत विजयश्री खेचून आणला म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आयपीएलमध्ये राहुल तेवतियाने दुसऱ्यांदा धमाकेदार फलंदाजी करून संगाला विजय मिळून दिला. यावेळी त्याच्या सोबतीला रियान देखील होता.

राजस्थान विजयाच्या जवळ पोहोचल्यानंतर मैदानात एक राडा देखील पाहायला मिळाला. अखेरच्या षटकात राजस्थानला विजयासाठी ६ चेंडूत ८ धावांची गरज होती. हैदराबादकडून खलील अहमद गोलंदाजी करत होता. पहिल्या चार चेंडूत राहुल आणि रियानने ६ धावा केल्या. विजयासाठी २ चेंडूत २ धावांची गरज असताना राहुल तेवतिया आणि गोलंदाज खलील अहमद यांच्यात वाद झाला. तेवातियाने खलील अहमदला शेवटच्या षटकात डिवचण्याचा प्रयत्न केला. मात्र, खलील अहमदने त्याच्या वर्तनाकडे दुर्लक्ष करत गोलंदाजीवर लक्ष केंद्रीत केलं. मात्र, विजयानंतर तेवातियाचा पारा अधिक चढला. खलील आणि त्यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची सुरु झाली. हैदराबाद संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने मध्यस्थी करत हा वाद शांत केला. राजस्थानचा राहुल तेवतिया आणि हैदराबादचा खलील यांच्यात वादविवाद झाला होता, जो हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरला अनुकूल वाटला नव्हता. यानंतर तेवतिया, वॉर्नर आणि खलील या तिघांत वाद पाहण्यास मिळाला. पंच आणि खेळाडूंच्या मध्यस्थीमुळे हा वाद मिटला मात्र, विजयानंतर तेवातियाचा संताप कॅमेऱ्यात कैद झाला. सोशल मीडियावर याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहे.

सामना जिंकल्यानंतर रियान परागचा आगळावेगळा डान्स:

रियाननेच विजयी षटकार लगावात संघाचा विजय निश्चित केला. या षटकारानंतर परागने आपल्या संघ सहकाऱ्यांकडे पाहून खास नृत्यू करत आनंद साजरा केला. मात्र परागने केलेले हे नृत्य नक्की काय आहे असा प्रश्न अनेकांना पडला आहे

याबाबत रियानसोबत संवाद साधला असता सामन्यानंतर पहिली प्रतिक्रिया देताना परागने, “मला अशा परिस्थितीमध्ये चांगला खेळ करताना आनंद होतो. जेव्हा संघाला माझी गरज असते तेव्हा मला चांगला खेळ करता येतो याचा आनंद आहे. तो बिहू डान्स होता. तो आसामचे पारंपारिक नृत्य आहे. आमच्या संघात काही आसाममधील खेळाडू आहेत. त्यामुळे विजयानंतर आम्ही असाच काही आनंद साजरा केला,” असं सांगितलं.