OnePlus 8T स्मार्टफोन भारतात लाँच

0
217

नवीन स्मार्टफोन OnePlus 8T भारतात लाँच करण्यात आला आहे. कंपनीने या फोनला एका व्हर्च्यूअल इव्हेंटमध्ये या फोनला लाँच केले आहे. हा वनप्लसचा पहिला स्मार्टफोन आहे. ज्यात ६५ वॉट वॉर्प चार्ज टेक्नोलॉजी सोबत आला आहे. फोनला दोन व्हेरियंट ८ जीबी प्लस १२८ जीबी आणि १२ जीबी प्लस २५६ जीबी स्टोरेजमध्ये लाँच केले आहे. यात ८ जीबी रॅमच्या फओनची किंमत ४२ हजार ९९९ रुपये तर १२ जीबी रॅमच्या फोनची किंमत ४५ हजार ९९९ रुपये आहे. फोनचा सेल १७ ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. OnePlus 8T मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. माहितीनुसार 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह हे मॉडेल लॉन्च केले जाईल.

OnePlus 8T फीचर्स :-

OnePlus 8T मध्ये 6.55 इंचाचा फुल HD + डिस्प्ले असू शकतो. ज्याचे रिझोल्यूशन 2400x 1080 पिक्सल असेल आणि ते 120Hz चा उच्च रीफ्रेश रेट देईल. त्याच वेळी डिस्प्लेच्या शीर्षस्थानी पंच-होल कटआउट दिले जाऊ शकते, ज्यात एक सेल्फी कॅमेरा असेल. याची स्क्रीन One Plus 8 पेक्षा अधिक सपाट असेल. OnePlus 8T मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसर व 8 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज देण्यात येईल. डिव्हाइसमध्ये आणखी एक प्रकार देण्यात आला आहे जो 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजसह सुसज्ज असेल. हा फोन अँड्रॉइड OxygenOS 11 वर आधारित काम करताना दिसणार आहे.

फोनमध्ये अँड्रॉयड 11 आउट ऑफ द बॉक्स वर बेस्ड Oxygen OS 11 मिळणार आहे. फोनमध्ये ऑल्वेज ऑन डिस्प्ले, बिटमोजी, लाइव वॉलपेपर आणि ग्रुप जेन मोड यासारखे फीचर्स दिले आहेत. फोनला पॉवर देण्यासाठी यात 4500mAh ची बॅटरी दिली आहे. हा फोन ६५ वॉट वॉर्प चार्ज टेक्नोलॉजीला सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे की, १५ मिनिटात चार्ज केलेल्या फोनची बॅटरी दिवसभर चालते.

कॅमेरा
फोनच्या कॅमेर्‍याबद्दल सांगायचे तर त्याच्या मागील बाजूस 48-मेगापिक्सलचा प्राथमिक असेल जो Sony चा IMX 586 सेन्सर आहे. OIS आणि EIS चे वैशिष्ट्ये यात दिली जाऊ शकतात. याशिवाय दुसरा कॅमेरा 16MP अल्ट्रा-वाइड लेन्सचा असेल जो 116˚ च्या दृश्यासह उपलब्ध असेल. टेलीफोटो लेन्सऐवजी यात 5 मेगापिक्सलचा मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर मिळेल. तसेच फोनमध्ये 4,500mAh बॅटरी देखील देण्यात आली आहे, जी 65W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी असेल.