हनी ट्रॅप म्हणजे काय? कशी काळजी घ्याल?

0
685

एखाद्या व्यक्तीस अडकवण्यासाठी वापरलेले तंत्र म्हणजे हनी ट्रॅप होय. खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याच्या किंवा तिच्याकडून गोपनिय माहिती काढून घेणे, ब्लॅकमेल करणे म्हणजेच हनीट्रॅप. वेगवेगळ्या गप्तचर यंत्रणांचं हुकूमी हत्यार म्हणून हनीट्रॅप जगभरात प्रसिद्ध आहे. ‘मद्रास कॅफे’ सिनेमामध्ये बाला नावाच्या कॅरेक्टरला ज्या पद्धतीनं ब्लॅकमेल केलं जातं ते हनी ट्रॅपच आहे. अशी कुठलीही माहिती जी गोपनीय आहे. पण, ती उघड झाली तर मोठं नुकसान किंवा फायदा किंवा युद्ध किंवा जीवाला धोका असं काहीही घडू शकतं ती मिळवण्यासाठी प्रेमाचा आणि खोड्या दिखाव्याचा वापर करणं म्हणजेच हनी ट्रॅप.

संबंध अशा अनेक क्षेत्रात हनी ट्रॅप गोष्ट नेहमीची आहे. त्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या लढवल्या जातात आणि वेगवेगळ्या लोकांची मदत सुद्धा घेतली जाते. आंतराराष्ट्रीय करार-मदार यांची गोपनीय माहिती काढणे. सुरक्षा गुपितं फोडणे, कॉर्पोरेट करारांसाठी शारीरिक संबंधाचा वापर करणे. अशा अनेक कारणांसाठी हनी ट्रॅपचा वापर केला जातो.

एखाद्याकडून गुप्त माहिती काढण्यासाठी महिलांचा वापर करून त्याला आपल्या जाळ्यात ओढायचे याला हनी ट्रॅप म्हणतात. या पद्धतीला जगभरात सर्वत्र हजारो वर्षांचा इतिहास आहे. गुप्तहेरांपेक्षा हे काम प्रभावी मानलं जातं. बॉण्डपटात हटकून असा हनी ट्रॅप बघायला मिळतो. दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील ‘हनी ट्रॅप’ खूप गाजले होते. मॅच फिक्सिंग प्रकरणात बुकींकडून असा ‘हनी ट्रॅप’ लावल्याचे नुकतेच समोर आले होते. मंत्री, व्यावसायिक, खेळाडू या हनी ट्रॅपमध्ये अडकल्याची अनेक उदाहरणे आहेत.

हनी ट्रॅप पासून सावध कसे राहाल?

अनोळखी व्यक्तीचा मेसेज आल्यानंतर शहानिशा केल्याशिवाय त्याला आपली माहिती देऊ नये.

सोशल मीडियावर स्वतःबद्दल किंवा कुटुबियांबद्दलची माहिती टाकताना विचार करावा

अनोळखी व्यक्तीच्या लगेचच कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नये