प्यार दोस्ती है; कुछ कुछ होता है चित्रपटाला झालेय २२ वर्ष पुर्ण

0
942

दिग्दर्शक करण जोहरचा चित्रपट ‘कुछ कुछ होता है’ हा ९०च्या दशकातील सुप्परहिट चित्रपट होता. आज पण या चित्रपटाला लोक फार आवडीने बघतात. या चित्रपटापासूनच करण जोहरने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले होते. 16 ऑक्टोबर 1998 रोजी ‘कुछ कुछ होता है’ हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटाच्या रिलीजला आज 22 वर्षे पूर्ण झाली आहे. शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जी यांचा हा सिनेमा त्यावर्षीचा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला होता.

कुछ कुछ होता है…. तुम नही समझोगे…’ असं म्हटलं की लगेचच डोळ्यांसमोर ‘राहुल’, ‘अंजली’, ‘टीना’ ही पात्र उभी राहतात. 90 च्या दशकात प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या कुछ कुछ होता है या चित्रपटातील ही पात्र. ‘प्यार दोस्ती है..मैत्रीतच खरं प्रेम आहे, यावर विश्वास ठेवण्यास भाग पाडणारा हा चित्रपट अजूनही पाहायला आवडतो.

कुछ कुछ होता है चित्रपटाबाबत काही गोष्टी :

  • करण जोहर दिग्दर्शित हा चित्रपट यूकेच्या टॉप टेन बॉलिवूड चित्रपटांमध्ये सामील झालेला पहिला सिनेमा ठरला.
  • ‘हम आपके है कौन’ आणि ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या चित्रपटानंतर बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा हा तिसरा चित्रपट ठरला होता. याचे संगीतही प्रचंड गाजले होते. इतकेच नाही तर तब्बल आठ फिल्मफेअर पुरस्कार मिळवणारा हा एकमेव चित्रपट आहे
  • राणी मुखर्जीने साकारलेली भूमिका सुरुवातील ट्विंकल खन्नाला ऑफर झाली होती. मात्र तिने नाकारल्यानंतर ही भूमिका राणीच्या वाट्याला आली. विशेष म्हणजे स्क्रिप्ट न वाचताच राणीने या चित्रपटासाठी आपला होकार कळवला होता.
  • कुछ कुछ होता है’च्या चित्रीकरणाच्या वेळी किंबहुना चित्रपटात एका मुलीच्या आईच्या भूमिकेत झळकणारी राणी ही त्यावेळी अवघ्या 19 वर्षांची होती.
  • या चित्रपटात सलमान खानने गेस्ट अपिअरन्स दिला होता. सलमानच्या भूमिकेसाठीही सुरुवातीला सैफ अली खान आणि चंद्रचुड सिंग यांच्या नावांचा विचार झाला होता. मात्र दोघांनीही ही भूमिका नाकारली. त्यानंतर सलमानची वर्णी या सिनेमात लागली.
  • ‘कुछ कुछ होता है’ मधील गाणीही विशेष गाजली. पण, या चित्रपटातील ‘साजन जी घर आए..’ या गाण्याच्या चित्रीकरणावेळी सलमान खान आणि काजोल हे एकमेकांशी बोलत नव्हते.
  • चित्रपटात छोट्या ‘अंजली’च्या भूमिकेत झळकणाऱ्या तेव्हाच्या बालकलाकार सना सईद हिने त्यावेळी रडण्याची दृश्यं चित्रीत करण्यासाठी ग्लिसरीन वापरण्यास नकार दिला होता. त्यामुळे मग नाईलाजास्तव करण तिला खरंखुरं रडवण्याचा प्रयत्न करत असे.
  • या चित्रपटाचा टायटल ट्रॅक हा स्कॉटलंडमध्ये शूट करण्यात आला होता. याच्या चित्रीकरणाला दहा दिवसांचा अवधी लागला होता.

कुछ कुछ होता है चित्रपटाला मिळालेले पुरस्कार:-

फिल्मफेअर पुरस्कार
सर्वोत्तम चित्रपट
सर्वोत्तम दिग्दर्शक – करण जोहर
सर्वोत्तम अभिनेता – शाहरूख खान
सर्वोत्तम अभिनेत्री – काजोल
सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता – सलमान खान
सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री – राणी मुखर्जी
सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक – उत्तम सिंग

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
सर्वोत्कृष्ट सर्वांगीण मनोरंजक चित्रपट
सर्वोत्तम महिला पार्श्वगायक – अलका याज्ञिक

या चित्रपटाच्या रिलीजला 22 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अभिनेत्री काजोल हिने आपल्या सोशल नेटवर्किंग साइटवर चित्रपटाच्या आठवणींना उजाळा देत राहुल आणि अंजलीचे कार्टुन शेअर करुन त्याला #22YearsOfAnjali #KKHHmemories हे हॅशटॅग दिले आहेत.