कोरोना संकटात देशात कॅशलेस ट्रांजक्शन वेगाने वाढत आहे. ट्रांजक्शनमध्ये क्रेडिट आणि डेबिट कार्डचे व्यवहार सुद्धा वाढले आहेत. अशावेळी यामध्ये फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये सुद्धा वाढ झाली आहे. त्यासोबतच वाढत आहेत ऑनलाईन आणि कार्ड पेमेंटचे गुन्हे. तंत्रज्ञान जसं बदलतं तस चोर लोकही स्वतःला अपडेट करत असतात. लोकांना लुटण्यासाठी ते नवे नवे फंडे शोधून काढतात. त्यामुळे ऑनलाईन फ्रॉडची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
जर तुम्हालाही तुमच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या व्यवहाराबाबत शंका असेल तर जो तुम्ही केलेला नाही, तर कोणताही उशीर न करता बँकेकडे तक्रार करा. प्रत्येक बँकेने यासाठी वेगवेगळे नंबर्स जारी केले आहेत, ज्यावर कॉल करून या व्यवहाराची तक्रार करा, सोबतच आपले कार्ड ब्लॉक करू शकता. त्यामुळे आपल्या पैशांचे रक्षण आपल्यालाच करायला हवे.
अशी करा तक्रार
क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डबाबतचच्या फ्रॉडची तक्रार करताना तुमच्याकडे ही माहिती असणे आवश्यक आहे. संबंधित बँकेचे मागील सहा महिन्याचे स्टेटमेंट घ्या. संशयास्पद ट्रांजक्शन संबंधित प्राप्त झालेल्या एसएमएसची एक कॉपी बनवा. बँकेचे पासबुक सांभाळून ठेवा. बँकेच्या रेकॉर्डनुसार, आयडी प्रूफ आणि ए़ड्रेस प्रूफची कॉपी ठेवा. या कागदपत्रांसह आपल्या जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन संपूर्ण देऊन तक्रार दाखल करा.
बँकेतून आलेला फोन खरा की खोटा?
बँक कधीही आपल्या ग्राहकांना फोन करून त्यांची खासगी माहिती पासवर्ड किंवा वन टाइम एसएमएस पासवर्ड बाबत विचारत नाही. याच्यातून ग्राहकाच्या खात्यातून इंटरनेट बँकिंगद्वारे फसवणूक करून पैसे काढले जातात. अशा फोन कॉलला उत्तर देऊ नका. जर तुमच्याकडून कुणी माहिती मागत असेल तर तो फ्रॉड कॉल आहे, हे ओळखा.
हे लक्षात ठेवा:-
१) तुम्ही एखाद्या एटीएममध्ये जाल तेव्हा एका हाताने पिन नंबर टाकत असताना दुसऱ्या हाताने मशीनचे किपॅड झाकण्याचा प्रयत्न करा. जेणेकरुन एटीएम
बाहेर उभ्या असलेल्या व्यक्तिला किंवा कॅमेऱ्यामध्ये पिन नंबर दिसणार नाही.
२) आपला पिन नंबर कुठेही लिहून ठेवू नका किंवा सांगू नका
३) शॉपिंग आणि एटीएममधून आलेली रिसीट जपून ठेवा किंवा फाडून फेकून द्या.
४) कार्डवर कधीही पिन नंबर लिहून ठेवू नका किंवा कार्डवर असलेल्या नंबरपैकी चार आकडे पिन म्हणून ठेवू नका.
५) कार्डच्या माहितीबाबत जर फोन किंवा ईमेल आला तर त्याला कोणतेही उत्तर देऊ नका.
६)ऑनलाईन वेबसाटईवर डेबिट कार्डची माहिती टाकताना विश्वासार्ह साईटवरून खरेदी करा.
७) तुमच्या अकाऊंटवर होणाऱ्या प्रत्येक ट्रॅन्झॅक्शनबाबत SMS सर्विस सुरु करुन घ्या.