केंद्र सरकारने विदेश नागरिकांना भारतात येण्याची सूट दिली आहे. पर्यटक व्हिसा वगळता आता विदेशी नागरिक इतर कोणत्याही कारणासाठी भारतात येऊ शकणार आहेत. इलेक्ट्रॉनिक, पर्यटन आणि वैद्यकीय श्रेणी वगळता सर्व सर्वांना प्रवासासाठी व्हिसा (visa) बंदी उठविल्याने याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे सरकारने ठरविले आहे. ओव्हरसीज सिटीझन ऑफ इंडिया (ओसीआय) आणि पर्सन ऑफ इंडियन ओरिजन (पीआयओ) कार्डधारकांना व्हिसा मंजूर करण्यासाठी सरकारने मान्यता दिली आहे. गृह मंत्रालयाने म्हटले आहे की या व्यतिरिक्त परदेशी विद्यार्थी आणि व्यावसायिकांनाही भारत भेटीसाठी व्हिसा देण्यात येणार आहे. तसेच, सरकारने पर्यटकांच्या व्हिसावरील बंदी कायम ठेवली आहे.
सरकारने परदेशींना देशात प्रवेश देण्यासाठी निवडक विमानतळ आणि इमिग्रेशन चेक पोस्टला परवानगी दिली आहे. सरकारच्या या निर्णयामध्ये वंदे भारत मिशन, एअर ट्रान्सपोर्ट बबल एरेंजमेंट किंवा शासनाने मंजूर केलेली नॉन शेड्यूल कमर्शियल फ्लाइटचाही समावेश करण्यात आलेला आहे.
जलमार्गाने येण्याचीही मुभा
गृह मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, भारत सरकार पर्यटक वगळता सर्व ओसीआय, पीआयओ कार्डधारक आणि इतर परदेशी नागरिकांना व्हिसावर कोणत्याही हेतूने भारतात येण्याची परवानगी देत आहे. ते अधिकृतपणे चेक पोस्टद्वारे हवाई किंवा जलमार्गाद्वारे देशात प्रवेश करू शकतात.
परदेशी लोक वैद्यकीय व्हिसासाठी अर्ज करू शकतील
गृहमंत्रालयाच्या ताज्या निर्देशानुसार इलेक्ट्रॉनिक व्हिसा, पर्यटक व्हिसा आणि वैद्यकीय व्हिसांवितिरिक्त सर्व प्रकारचे उपलब्ध व्हिसा त्वरित प्रभावाने पूर्ववत करण्यात आले आहेत. उपचारांसाठी भारतात येणार्या परदेशी नागरिकांना अटेंडेटसह वैद्यकीय व्हिसासाठी अर्ज करावा लागेल.
सुचनांचे पालन करावे लागेल
परदेशातून येणाऱ्या लोकांना आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या क्वारंटाईन आणि कोविड -१९च्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे लागेल. वैद्यकीय उपचारांसाठी भारतात येण्यास इच्छुक असलेले परदेशी नागरिक वैद्यकीय अटेंडंटसमवेत वैद्यकीय व्हिसासाठी अर्ज करू शकतात.