एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश; शरद पवारांच्या उपस्थितीत केला प्रवेश

0
340

मी गेल्या चाळीस वर्षांपासून राजकारण करतो आहे. मात्र कधीही कुणाच्या पाठीत खंजीर खुपसला नाही. तोंडावर गोड बोलायचं, तुम्ही ज्येष्ठ म्हणायचं आणि मागून खंजीर खुपसायचा हे मी कधीही केलं नाही. ४० वर्षे मी भाजपाची सेवा केली, त्याबदल्यात मला काय दिलं पक्षाने? माझ्यावर झालेल्या अन्यायाचं उत्तर भाजपाचे लोक देऊ शकले नाही. मी पक्ष सोडावा अशी कार्यकर्त्यांची भावना होती. भाजपाला रामराम केल्यानंतर अखेर आज एकनाथ खडसे यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांनी मला प्रवेश दिला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आयुष्यातली ४० वर्षे मी भाजपामध्ये काम करत आलो आहे. ४० वर्षे पक्षात राहिल्यानंतर एकाएकी पक्ष सोडावासा वाटला नाही. मात्र महाराष्ट्राच्या विधानसभेत वारंवार माझी बदनामी झाली, छळ करण्यात आला. गैरव्यवहार असेल तर कागदपत्रं द्या.. मात्र या क्षणापर्यंत मला उत्तर मिळालेला नाही. मी आजवर खूप संघर्ष केला. आज राष्ट्रवादीत आल्याने मला माझ्या डोक्यावरचं ओझं हलकं झाल्यासारखं वाटतं आहे असंही खडसे यांनी म्हटलं आहे.

एकनाथ खडसे यांची राजकीय कारकीर्द:-

१९८८ – कोथळी गावचे सरपंच

एकनाथ खडसे यांच्या राजनैतिक जीवनाची सुरुवात कोथळीचे सरपंच म्हणून झाली

१९८९ – एदलाबाद विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार

मुक्ताईनगर तालुक्यातून विधानसभेसाठी निवडणुकीसाठी उभे राहिले व ते निवडून आले

१९९५ – शिवसेना भारतीय जनता युती सरकारमध्ये अर्थ, पाटबंधारे मंत्री खाती सांभाळली

२००९ – विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली

२०१४ – शिवसेना भाजपा युती तुटल्याची घोषणा

२०१४ – भाजपच्या सरकारमध्ये महासूल मंत्री, कृषी मंत्री, अल्पसंख्याक मंत्री, उत्पादन शुल्क मंत्री

२०१६ – पदाचा गैरवापर आणि भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे महसूल मंत्रिपदावरून राजीनामा दिला

२०१९– विधानसभेचे तिकिट नाकारण्यात आले

२०२० – राष्ट्रीय कार्यकारणीतही कोणतेही स्थान न मिळाल्याने अखेर भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा

२३ ऑक्टोबर २०२० – शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश