Birthday Special; मराठी चित्रपट सृष्टीतला स्टाइल आयकॉन सिद्धार्थ जाधवचा आज वाढदिवस

0
350

मराठी मनोरंजनसृष्टीतला स्टाइल आयकॉन आणि एक उत्तम अभिनेता अशी ओळख असलेल्या सिद्धार्थ जाधव याचा आज वाढदिवस. नाटक, सिनेमा, मालिका अशा तिन्ही व्यासपीठांवर त्याने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. हिंदी सिनेमांमध्येही सिद्धार्थने आपली विनोदी भूमिका साकारली. हिरो बनण्यासाठी चांगले दिसणे नव्हे तर चांगला अभिनय करता येणे गरजेचे असते हे सिद्धार्थने सिद्ध करून दाखवले. 23 ऑक्टोबर 1981 साली रत्नागिरी येथे जन्मलेला सिद्धार्थला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. सिद्धार्थने इंडस्ट्रीत येण्यासाठी बराच संघर्ष केला आहे. सिद्धार्थला त्याच्या सावळ्या रंगामुळे हिणवले जात असे पण त्यावर मात करत सिद्धार्थने टॅलेंटच्या बळावर चित्रपटसृष्टीतील त्याचे स्थान पक्के केले आणि आज सिद्धार्थ लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे.

कॉलेज जीवनापासून सिद्धार्थला अभिनयाची आवड होती. कॉलेजमध्ये असताना सिद्धार्थने अनेक एकांकिका गाजवल्या. काही वर्षांपूर्वी रंगभूमीवर आलेल्या ‘लोच्या झाला रे’ या सुप्रसिद्ध नाटकात गोलांट्या उड्या खाणारा, इकडून तिकडे उड्या मारणारा सिद्धार्थ प्रेक्षकांच्या चांगलाच स्मरणात राहिला. पुढे हेच नाटक खो-खो या सिनेमाच्या रुपात मोठ्या पडद्यावर आले.

“माझा नवरा तुझी बायको”, “अग बाई अरेच्या”, “बकुळा नामदेव घोटाळे”, “जबरदस्त”, “साडे माडे तीन”, “दे धक्का”, “गोलमाल रिटर्नस”, “बाप रे बाप डोक्याला ताप”, “गलगले निघाले”, “उलाढाल”, “सुंबरान”, “गाव तसं चांगलं”, “मी शिवाजीराजे भोसले बोलतोय”, “सालीने केला घोटाळा”, “शिक्षणाच्या आयचा घो”, ‘”हुप्पा हुय्या”, “पारध”, “क्षणभर विश्रांती”, “इरादा पक्का”, “लालबाग परळ”, “फक्त लढ म्हणा”, “सुपरस्टार”, “खो-खो”, “कुटुंब”, “भाऊचा धक्का!”, “टाइम प्लीज”, “प्रियतमा”, “मध्यमवर्ग”, “रझाकार”, “ड्रीम मॉल”, “अग बाई अरेच्या २” आणि ”ढोलकी” या चित्रपटातून ते वेगवेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या समोर आले आहेत. त्यांच्या विनोदी भूमिका प्रसिद्ध असल्या तरी त्यांनी खुप वैविध्य राखले आहे. येरे येरे पैसा पैसा आणि धुरळा हे त्याचे सध्याचे सुपरहिट ठरलेले सिनेमा आहेत.

सिद्धार्थने रोहित शेट्टीच्याच ‘गोलमाल’ चित्रपटात सत्तू सुपारी या कॉन्ट्रॅक्ट किलरची भूमिका साकारली होती. छोटी आणि विनोदी भूमिका असूनही सिद्धार्थ त्याच्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या लक्षात राहिला. ‘गोलमाल’ हा त्याचा पहिला हिंदी चित्रपट ठरला. यानंतर त्याने ‘सिम्बा’मध्ये काम केले त्याच्या ‘सिम्बा’मधील भूमिकेचे देखील कौतुक झाले.

सिद्धार्थ जाधवने मराठी चित्रपट सृष्टीचे असेच नाव उंचवावे आणि बॉलिवूडमध्येही चमकत राहावे अशी त्याला देसी डोकं च्या टीमकडून पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा.