नागराज मंजुळे झाले पोस्टमन; ‘तार’ रसिकांच्या मनाला भिडणार

0
487

राष्ट्रीय पुरस्कार विजेते नागराज मंजुळे हे मराठी सिनेसृष्टीतील एक नामांकित दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. ‘सैराट’, ‘फँड्री’, ‘हायवे’, ‘नाळ’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती करणारे नागराज आता एक नवा चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. या आगामी चित्रपटाचं नाव ‘तार’ असं आहे.

रितेशची निर्मिती संस्था ही मुंबई फिल्म कंपनी या नावाने ओळखली जाते. लवकरच ही संस्था काही मराठी लघुपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे. यापैकी पहिला लघुपट एका पोस्टमनची गाथा सांगणार आहे. ‘तार’ असे या लघुपटाचे नाव असून, तो लवकरच प्रदर्शित करण्यात येणार आहे.

तार’ हा एक लघुपट आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन पंकज सोनावणे करणार आहेत. तर नागराज मंजुळे एक अभिनेता म्हणून चाहत्यांच्या भेटीस येत आहेत. नुकतेच या चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झालं. या पोस्टरमध्ये नागराज लोकांची पत्र पोहोचवणाऱ्या एका पोस्टमनच्या भूमिकेत दिसत आहेत. सध्या दुर्मिळ होत चाललेला पोस्टाचा डबा आणि बंद पडलेली ‘तार’ सेवा यासह पोस्टमन काकांची कथा या लघुपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

या चित्रपटामध्ये नागराज मंजुळेसोबत शिवाय भुषण मंजुळे, भुषण हंबे, विवेक जांबळे, पूजा डोळस या नामांकित कलाकारांनीही चित्रपटात काम केलं आहे. लक्षवेधी बाब म्हणजे याच कलाकारांसोबत नागराज यांनी सैराट आणि फँड्री सारख्या सुपरहिट चित्रपटांची निर्मिती केली होती.

रितेश देशमुखने ‘तार’ या लघुपटाची माहिती आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून उलगडली आहे. सोबतच तारमधील नागराज मंजुळे यांचे पोस्टमनच्या रुपातले सुरेख इलस्ट्रेशन केलेले पोस्टरही त्याने शेअर केले आहे.