- जि.प. सदस्या तनुजाताई घनवट यांच्याकडून कोरोना योध्दयांना कोरोनाप्रतिबंधक किटचे वाटप
कोरोना व्हायरसपासून सर्वांनी सुरक्षित राहावे यासाठी डॉक्टर्स, पोलीसपासून ते ग्रामपंचायत कर्मचारी, सफाई कामगार या सर्वांनी मोलाचा वाटा उचलला आहे. दिवसरात्र काम करून कोरोनाला कसा आळा घालता येईल यासाठी अहोरात्र काम केल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे.
खेड तालुक्यातील पश्चिम विभागातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत असणाऱ्या वाडा ग्रामपंचायतही कोरोनापासून नागरिकांचा कसा बचाव करता येईल यासाठी प्रयत्न करत आहे. वाडा गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील आणि गावातील नागरिकांनीही एकत्र येऊन चांगल्याप्रकारे काम केले आहे.
याच वाडा गावातील कार्यक्षेत्रातील पोलीस पाटील , आशा वर्कर , अंगणवाडी सेविका – मदतनीस , ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामसेवक, सलून व्यावसायिक यांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी आवश्यक कोरोना कीट वाटपाचा उपक्रम वाडा येथील ग्रामपंचायत कार्यालयात सामाजिक अंतराचे पालन करुन संपन्न झाला. वाडा कडूस गटाच्या विद्यमान कार्यक्षम जिल्हा परिषद सदस्या सौ. तनुजाताई घनवट यांच्या वतीने ” कोरोना किट ” वाटप करण्यात आले.
वाडा ग्रामपंचायतीला १७ सॅनिटायझर स्टॅन्ड , सॅनिटायझर तसेच आशा वर्कर , अंगणवाडी सेविका , सलून व्यावसायिक यांना प्रत्येकी एक एक कोरोनाप्रतिबंधक किटचे वितरण करण्यात आले.समाजाच्या सेवेसाठी अहोरात्र सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रती यावेळी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
या उपक्रमाप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या मा.तनुजाताई घनवट यांच्यासह वाडा गावचे पोलीस पाटील दिपक पावडे , ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत सदस्य , ग्रामसेवक व शासकीय कर्मचारी उपस्थित होते.