भारतीय संस्कृती आणि परंपरेमध्ये जसा पितृपक्ष पाळून पितरांचे स्मरण करण्याची प्रथा आहे. त्याच धर्तीवर ख्रिस्ती बांधव हॅलोवीन साजरा करतात. दरवर्षी 31 ऑक्टोबर दिवशी हॅलोविन (Halloween) साजरं केलं जातं. अधिक धार्मिक वळण न देता भुताटकी आनंदी सण म्हणून हा दिवस साजरा केला जातो. या सणाची सुरुवात आयरलँड आणि स्कॉटलँड येथून झाली आहे. हा सण सल्टिक जातीचे लोकं नववर्षाची पूर्व संध्या म्हणून साजरा करतात. हॅलोवीन म्हणजे काय याबद्दल आपण जाणून घेऊया काही रंजक गोष्टी
दरवर्षी ३१ ऑक्टोबरला युरोप, अमेरिकेतल्या अनेक ख्रिश्चन देशांत ‘हॅलोवीन नाईट’ साजरी केली जाते, म्हणजे आपल्याकडे पितृपक्ष असतो तसेच काहीसे. यादिवशी अनेक मृत आत्मे पृथ्वीवर येतात अशी मान्यता आहे त्यामुळे त्यांच्यासाठी खास केक आणि इतर पदार्थांची मेजवानी केली जाते. पण याव्यतिरिक्तही खूपच अनोख्या पद्धतीने हा सण साजरा करण्याची प्रथा आहे.
या दिवशी लोक भूतांचे कपडे परिधान करून रस्तोरस्ती फिरतात. काहीजण रात्रीच्यावेळी झाडूवरून उडणारी चेटकीन बनतात, तर कोणी रक्तपिसासू बनून फिरतो. आता या दिवशी आत्मे खाली येतात म्हणजे लहान मुलांनी घाबरून घरात बसायचे असेही नसते. ‘हॉलोवीन नाईट’मध्ये लहान मुले मोठ्या संख्येने सहभागी होतात. लहान मुलेदेखील भूतांचे कपडे परिधान करून रात्री’ ट्रिक ऑर ट्रीट’ म्हणत घरोघरी फिरतात. प्रत्येकांच्या घरी जाऊन खाऊ गोळा करतात आणि जर कोणी खाऊ द्यायला नकार दिला की मात्र त्यांची काही खैर नसते. या दिवशी काही जण वेगवेगळ्या शक्कल लढवत शेजारी पाजा-यांना देखील घाबरवतात. पण आजच्या दिवशी सारे काही माफ असते. आजचा दिवस हा फक्त एकमेकांना घाबरवायचा आणि मजा मस्ती करण्याचा दिवस असतो.
या दिवसाची आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे ‘जॅको लँटर्न्स.’ भडक केशरी रंगाच्या भोपळ्यापासून बनवलेल्या या लँटर्न्सला या दिवशी विशेष महत्व असते. या भोपळ्यात डोळे नाक तोंड असलेला थोडा भयानक दिसणारा असा चेहरा कोरलेला असतो. या भोपळ्याच्या आत एक मेणबत्ती किंवा दिवस ठेवून त्याला हॅलोविनच्या दिवशी सर्वजण घराबाहेर ठेवतात. हा भोपळा दुरून पाहिल्यास भुतासारखा दिसतो. तसेच हा भोपळा भयानक व दृष्ट आत्म्यांना आपल्या घरापासून दूर ठेवतो अशी मान्यता असल्याने हॅलोवीनच्या दिवशी त्याला विशेष महत्व असते.
हॅलोवीन या शब्दाची फोड केल्यास तुम्हांला Hallows’ Eve यामध्येच त्याचा अर्थ समजतो. संत लोकांच्या स्मराणाची रात्र असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे 1 नोव्हेंबरच्या पूर्वसंध्येला त्याचं सेलिब्रेशन होतं. 1 नोव्हेंबरला चर्चमध्ये प्रार्थना केली जाते. तर 2 नोव्हेंबर पर्यंत त्याचं सेलिब्रेशन सुरू असतं. अमेरिकेमध्येही हॅलोवीन पार्टीचं मोठ्या स्वरूपात आयोजन केलं जातं. तेथे भोपळ्यांना भयावह वाटणार्या आकृतीमध्ये कापून त्यामध्ये दिवे सोडले जातात. याला ‘जॅक ओ लॅटन्स’ (Jack-o’-Lantern) असं देखील म्हटलं जातं. पहिला असा दिवा Turnips नावाच्या कंदात बनवला गेला होता.हॅलोविन सेलिब्रेशन मध्ये काळा आणि नारंगी रंग प्रामुख्याने वापरला जातो. नारंगी रंग हा शक्तीचं प्रतिक आहे. तसेच युरोपात ऑक्टोबरच्या शेवटच्या टप्प्यात हिवाळा आणि उन्हाळा यादरम्यानचा काळ असल्याने निसर्गातही सारी वृक्ष, पानं पिवळी, नारंगी रंगाची झालेली असतात. तर काळा रंग भय, मृत्यू यांचं प्रतिक आहे. त्यामुळे जन्म-मृत्यूच्या सेलिब्रेशनमध्ये नारंगी आणि काळ्या रंगाचा वापर केला जातो. ख्रिस्मस नंतर हॅलोविन हा पाश्चिमात्य देशात सर्वात मोठा कमर्शिल हॉलिडे असतो