जीन्सला छोटा खिसा का दिलेला असतो? जाणून घेऊया त्याबद्दलचा इतिहास

0
1004

आजच्या काळात आपण सगळेच पुरुष किंवा स्त्रिया सर्वच जीन्स घालतात. आरामदाय, चांगला लूक असण्याबरोबर जीन्स टिकाऊ सुद्धा असतात. तुम्ही जीन्स परिधान केली असाल तर समोरच्या खिशात एक लहान खिशाही आहे. आपण जीन्स पॅन्ट खरेदी करताना त्याचा रंग, डिझाईन, कपडा कसा आहे, स्ट्रेट फिट किंवा पेन्सील बॉटम कशी असावी याचा पुरेपुर विचार करत असतो. त्यात आपल्याला जरी जीन्समधील काही आवडले नाहीतर ती जीन्स आपण घेत नाही. पण तुम्ही कधी जीन्स विकत घेताना जीन्सच्या पॉकेटवर असलेल्या धातूच्या छोट्या छोट्या बटनांवर आणि खिशावर कधीच लक्ष देत नसाल. तर आज आम्ही तुम्हाला या मिनी पॉकेट मागचा एक इतिहास सांगणार आहोत…

असे म्हणतात की हे मिनी पॉकेट प्रथम 1879 मध्ये लेव्ही स्ट्रॉस नावाच्या कंपनीने सुरू केले होते जे आज आपण सर्व लेव्ही म्हणून ओळखतो. त्या काळी हे मिनी पॉकेट वॉच पॉकेट म्हणून ओळखले जात असे. विशेषतः काउबॉयसाठी हे पॉकेट डिझाइन केले होते.अठराव्या शतकात काउबॉय साखळ्यांची लहान घड्याळे वापरत. आणि तेव्हापासून लेव्ही स्ट्रॉसने जीन्समध्ये लहान खिसे बनवायला सुरुवात केली जेणेकरून काउबॉय त्यात आपले लहान आणि साखळीचे घड्याळ अगदी चांगल्या पद्धतीने ठेवू शकतात.

डेनीमच्या जीन्स प्रथम १८०० मध्ये मजुरांनी वापरायला सुरुवात केली. त्या शिवणारा शिंपी होता, जेकब डेविस. त्या मजबूत असल्याने खाणीत काम करणे सोपे जात असे. खाणी कामगार, गुराखी, आणि इतर पुरुष कामगार ती वापरू लागले, त्यावेळी त्यांच्याकडे छोटी घड्याळ असायची. घड्याळ छोट्या खिशात ठेवून, ते पडण्याची भीती नव्हती. यासह, आपण त्यात इतर काही लहान गोष्टी ठेवल्या तर त्यामध्ये स्क्रॅच येत नाहीत आणि ते त्याच ठिकाणी राहतात कारण त्यामध्ये फारच कमी जागा असते. त्यामुळे हे मिनी पॉकेट अतिशय फादेशीर ठरू शकतात. नंतर जीन्समध्ये अनेक बदल होत गेले.

खिशांना धातूची अत्याधुनिक बटणे आली व त्या जास्तच टिकाऊ बनत गेल्या. या खिशामुळे लोंबकळणार घड्याळ, या खिशात सुरक्षित ठेवण्यात येत होत, तसेच ते कुठे धडकून फुटण्याचा धोका कमी होत होता. मात्र सध्या हा खिसा चिल्लर आणि चावी ठेवण्यासाठी परफेक्ट आहे, या खिशाची तशी मागणीही तरूणांमध्ये आहे. काळाने खिशाचा उपयोग बदललाय, बदलत्या फॅशनमध्येही हा खिसा उपयोगाचा असल्याने, जीन्स बनवणाऱ्या ब्रॅण्डेड कंपन्यांनी तो कायम ठेवलाय.