अनलॉक: महाराष्ट्रात उद्यापासून सिनेमा हॉल, थिएटर, मल्टिप्लेक्स उघडण्यास परवानगी

0
335

राज्यातील थिएटर, नाट्यगृहे आणि मल्टिप्लेक्स ५० टक्के क्षमतेसह उद्यापासून सुरु होणार आहेत. कोरोना प्रतिबंधित क्षेत्राबाहेर असलेल्या सगळ्या थिएटर्सना, नाट्यगृहांना आणि मल्टिप्लेक्सना सुरु करण्याची मुभा देण्यात आली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने हा निर्णय घेतला आहे. मार्च महिन्याच्या मध्यापासून करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून थिएटर्स, नाट्यगृहं, शाळा सगळं बंद करण्यात आलं होतं. आता अनलॉकच्या पार्श्वभूमीवर हळूहळू अनेक आस्थापनांना संमती देण्यात येत आहे.

सिनेमा हॉल्स, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहं एकूण प्रेक्षक क्षमतेच्या ५० टक्के प्रेक्षकांसह उद्यापासून सुरु होणार आहेत. महाराष्ट्र सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. याच सोबत करोना प्रतिबंधित क्षेत्र अर्थात कंटेन्मेंट झोनच्या बाहेर असलेल्या योगा इन्स्टिट्युट आणि इन डोअर स्पोर्ट्सनाही संमती देण्यात आली आहे.

थिएटर, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे सुरु करण्यास परवानगी दिली तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम पाळणे बंधनकारक असणार आहे. तसेच कोरोना प्रतिबंधित क्षेत्र अर्थात कंटेन्मेंट झोनच्या बाहेर असलेल्या योगा इन्स्टिट्युट आणि इन डोअर स्पोर्ट्सनाही मुभा देण्यात आली आहे.

गेल्या सात महिन्यांपासून राज्यातील चित्रपटगृहे. नाट्यगृहे बंद आहेत. त्यामुळे मनोरंजन क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात जिम सुरु करण्यास परवानगी दिल्यानंतर चित्रपटगृहेही सुरु करण्याची मागणी जोर धरू लागली होती. याआधी याबाबत राज्य सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख (Cultural Affairs Minister Amit Deshmukh) यांच्यासमवे सिनेमा मालक आणि प्रदर्शक असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष नितीन दातार यांची बैठक पार पडली होती. आता राज्य सरकारने कोरोना नियमांचे पालन करून 50 टक्के आसन क्षमतेसह चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स आणि नाट्यगृहे सुरु करण्यास परवानगी दिली आहे.

महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे आठ महिन्यांपासून बंद असलेली थिएटर्स, मल्टिप्लेक्स आणि नाट्यगृहं उद्यापासून उघडणार आहेत. त्यामुळे थिएटर्स मालक आणि कलाकार यांना मोठा दिलासा मिळाला आहे.