दिवाळी खरेदी साठी पुण्याच्या बाजारपेठा सज्ज

0
502

आठवडय़ावर येऊन ठेपलेल्या दिवाळीच्या खरेदीसाठी शहरातील गर्दी पाहायला मिळत आहे. लक्ष्मी रस्ता, तुळशीबाग, मंडई परिसरात खरेदीसाठी झुंबड उडाल्याचे दृश्य पाहायला मिळाले. दिवाळीचा सण पुढील आठवड्यात येऊन ठेपला असताना पुणे शहरातील बाजारपेठा करोनाकाळातही सज्ज झाल्या आहेत.

कोरोनाकाळात ३ महिने दुकान बंद असल्याने दिवाळीसाठी का होईना आता गर्दी होईल आणि पुणेकर खरेदीसाठी बाहेर पडतील अशी आशा व्यापारीवर्ग करत असून त्यांनी कोरोनासाठी सोशल डिस्टंसिन्ग आणि मास्क अशी नियमावली दुकानांमध्ये ठेवली आहे.

दिवाळीची खरेदी शहरातील मध्य भागातून करायची हा पुणेकरांचा शिरस्ता. लक्ष्मी रस्ता भागातून कपडे खरेदी तसेच मंडई, तुळशीबाग परिसरातून आकाशकंदील, रांगोळी अन्य साहित्याच्या खरेदीसाठी पुणेकर सज्ज झाले आहे. आता ह्या आठवड्यातही मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे.

पुणे जिल्ह्यातून आजूबाजूच्या गावातील नागरिकही पुण्यात दिवाळीसाठी खरेदीसाठी येत असतात. निरनिराळ्या प्रकारचे आकाशकंदील, लाइटिंगच्या माळा तसेच पणत्या खरेदीला यावेळी विशेष महत्त्व असते.

पुण्यातील चितळे, काका हलवाई तसेच पुरोहित स्वीट सेंटरही सज्ज झाले असून वेगवेगळ्या स्वीटची मेजवानी घेण्यासाठी तिथेही गर्दीची झुबंड पाहायला मिळत आहे. पुणेकर आवर्जुन दिवाळीच्या स्वीट खरेदीसाठी तिथे भेट देत असतात.

मुखपट्टी नाही तर प्रवेश नाही

दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने दुकांनामध्ये खरेदीसाठी गर्दी होणार असली तरी या गर्दीमुळे करोनाचा संसर्ग पसरू नये याची दक्षता शहरातील व्यापारी घेत आहेत. दिवाळीच्या खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना सर्वच व्यापाऱ्यांनी मुखपट्टीचा वापर करणे अनिवार्य केले आहे. ग्राहकांकडे मुखपट्टी नसल्यास दुकानांमध्ये प्रवेश दिला जाणार नाही,