ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात बदल; रोहितचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी कसोटी संघात समावेश

0
231

ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर जाणाऱ्या संघात टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्माची निवड झाली आहे. दुखापतीमुळे त्याला या दौर्‍यावर जाणार्‍या संघात स्थान देण्यात आले नव्हते. सोमवारी, बीसीसीआयकडून माहिती देण्यात आली आहे की रोहित ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर कसोटी मालिकेसाठी उपलब्ध असेल.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रोहित शर्माला कसोटी संघात सामील करण्यात आले आहे. BCCI सचिव जय शाह यांनी सोमवारी याबाबत माहिती दिली. तर, कर्णधार कोहली पहिल्या कसोटी सामन्यानंतर पॅटरनिटी लीव्हवर जाणार आहे.

दरम्यान, संजू सॅमसनला टी-20 नंतर वन-डे संघातही संधी मिळाली आहे. तर, वरुण चक्रवर्ती खांद्याच्या दुखापतीमुळे औस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर गेला आहे. वेगवान गोलंदाज टी नटराजनला चक्रवर्तीच्या जागी टी-20 संघात सामील करण्यात आले आहे. भारतीय टीम ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 3-3 वन-डे आणि टी-20 नंतर 4 कसोटी सामने खेळेल.

BCCIने ट्विट करून काही बदलांबद्दल माहिती दिली. रोहित शर्माला केवळ कसोटी मालिकेसाठीच संघात समाविष्ट करण्यात आले आहे. वन डे आणि टी२० मालिकांमध्ये त्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रोहित शर्माच्या दुखापतीबाबत रविवारी (१ नोव्हें) BCCIची वैद्यकीय समिती माहिती घेणार होती. त्यांनी त्यांचा अहवाल BCCI ला दिल्यानंतर रोहित शर्माच्या संमतीनेच असा निर्णय घेण्यात आला असल्याचे BCCIने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद केले आहे.

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याची पत्नी अनुष्का गरोदर आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील पहिला कसोटी सामना खेळून झाल्यावर विराट पालकत्व रजा घेऊन भारतात परतणार आहे. BCCIने त्याची रजा मंजूर केली असल्याचे पत्रकात सांगण्यात आले आहे. वृद्धिमान साहा आणि इशांत शर्मा हे दोघे अद्यापही तंदुरूस्त नसल्याने त्यांच्याबाबतचा निर्णय नंतर घेण्यात येणार आहे.

टीम इंडिया कसोटी संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, शुबमन गिल, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जाडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज

टीम इंडिया टी२० संघ
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मयंक अग्रवाल, लोकेश राहुल (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रवींद्र जाडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चहर, टी नटराजन

टीम इंडिया एकदिवसीय संघ
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुबमन गिल, केएल राहुल (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयंक अग्रवाल, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक)

असे असेल टीम इंडियाचे वेळापत्रक

पहिला वन-डे सामना – २७ नोव्हेंबर – सिडनी
दुसरा वन-डे सामना – २९ नोव्हेंबर – सिडनी
तिसरा वन-डे सामना – १ डिसेंबर – मनुका ओव्हल
————————————————————–
पहिला टी-२० सामना – ४ डिसेंबर – मनुका ओव्हल
दुसरा टी-२० सामना – ६ डिसेंबर – सिडनी
तिसरा टी-२० सामना – ८ डिसेंबर – सिडनी
—————————————————————
पहिला कसोटी सामना – १७ ते २१ डिसेंबर – अ‍ॅडलेड (दिवस-रात्र)
दुसरा कसोटी सामना – २६ ते ३० डिसेंबर – मेलबर्न
तिसरा कसोटी सामना – ७ ते ११ जानेवारी २०२१ – सिडनी
चौथा कसोटी सामना – १५ ते १९ जानेवारी – गॅबा