दिवाळी सणामुळे भात पट्ट्यात अनेक ठिकाणी भात कापणी वेगाने सुरू झाली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील भात उत्पादकांची चांगलीच धावपळ सुरू आहे. येत्या महिनाअखेरपर्यंत बऱ्यापैकी कापणी पूर्ण होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे.
पश्चिम पट्ट्यात असलेली मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, खेड, जुन्नर आणि आंबेगाव तालुके ही भाताची तालुके म्हणून ओळखली जातात. यंदा पश्चिम भागात वेळेवर पाऊस दाखल झाल्यामुळे वेळेवर भात लागवडी झाल्या होत्या. काही भागांत पावसाचा खंड पडल्याने उशिरानेही लागवडी झाल्याचे चित्र होते.
तालुक्यातील भीमाशंकर, भोरगिरी, आंबोली परिसर जास्त पावसाचा प्रदेश आहे जवळपास दीड ते तीन हजार मिलीमीटर पाऊस या परिसरात दरवर्षी पडतो यावर्षी हे प्रमाण जास्त होते. यामुळे या भागात केवळ भाताचे पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्यातच अधूनमधून पाऊस पडत असल्याने शेतक-यांची मोठ्या प्रमाणात धावपळ होत आहे. भाताची काढणी (कापणी) झाल्याबरोबर त्याची झोडपणी करण्यास शेतकरी सरसावला आहे. लगेचच भात झोडपणी केल्याने शेतक-यांना तांदूळ उपलब्ध होत आहे. डेहणे, आव्हाट, पाईट, आंबोली, घोटवडी, गडद, कुडे या पंचक्रोशीत सद्या भात कापणी आणि झोडपणीच्या वेग आला आहे. दिवाळीचा सण जवळ येऊन ठेपला असला तरीही शेतकरी मात्र शेतात भाताची कापणी करीत आहेत.
यंदा पश्चिम भागात वेळेवर पाऊस दाखल झाल्यामुळे वेळेवर भात लागवडी झाल्या होत्या. काही भागांत पावसाचा खंड पडल्याने उशिरानेही लागवडी झाल्याचे चित्र होते. या भागातील भोर, वेल्हा, मुळशी, मावळ, खेड, आंबेगाव, जुन्नर या तालुक्याच्या पश्चिम भागात यामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात इंद्रायणी, फुले समृद्धी अशा वाणाच्या भाताची लागवड केली होती. याशिवाय पार्वती, सोनम, तृप्ती, साईराम या वाणाकडेही शेतकऱ्यांचा कल वाढला होता. परंतु शेतकऱ्यांनी सर्वाधिक इंद्रायणी या वाणाची सर्वाधिक लागवड केली होती. सुरुवातीच्या काळात काही भागात चांगला पाऊस असल्याने भात पिके जोमात होती. परंतु कापणीच्या अवस्थेत असताना जोरदार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.