पुण्यातील शाळा १३ डिसेंबर पर्यंत बंदच राहणार

0
246

पुण्यातील शाळा १३ डिसेंबरपर्यंत बंदच राहणार आहेत. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या संदर्भातले आदेश दिले आहे. १३ डिसेंबरला पुण्यातली करोनाची स्थिती पाहणार त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल. पालकांशी चर्चा करुन आणि सद्यस्थिती लक्षात घेऊन निर्णय घेणार आहे.पुण्यातील महापालिका आणि खासगी शाळा बंद राहणार आहेत असंही स्पष्ट केले आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. करोनाचे रुग्ण वाढत आहेत. करोना संसर्ग आणखी वाढू नये म्हणून १३ डिसेंबरपर्यंत पुण्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. २३ नोव्हेंबर पासून नववी ते बारावीपर्यंत शाळा सुरू करण्यात येणार आहे. मात्र सद्धस्थितीचा आढावे घेत पालकांशी चर्चा करण्यात आली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान १३ डिसेंबरला परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये अनलॉक सुरु झाल्यानंतर रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसू लागली. तसंच दिवाळीच्या आधीही बाजारांमध्ये गर्दी झाली होती. यामुळे करोनाची दुसरी लाट येऊ शकते अशी शक्यता आहे. अशात ही लाट येऊन संसर्ग वाढू नये म्हणून तूर्तास शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे, मुंबई आणि ठाणे या ठिकाणी असलेल्या शाळा बंद राहणार आहेत. २३ नोव्हेंबरपासून शाळा उघडण्याचे आदेश सरकारने दिले असले तरीही स्थानिक प्रशासनाने परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा असंही या आदेशांमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे आता या तीन प्रमुख शहरांमधल्या शाळा बंद असणार आहेत.