भारतात क्रिकेट हा खेळ सर्वांच्या अत्यंत जिव्हाळयाचा आहे. जसे पुरुष क्रिकेट संघ मैदानावर अप्रतिम कामगिरी करत असतात तशाच प्रकारे भारतीय महिला संघाने क्रिकेट मध्ये अप्रतिम कामगिरी बजावली आहे. भारताच्या महिला टीममध्ये काही खेळाडू असे आहेत, की त्यांनी आपल्या टॅलेंटने जगात स्वतंत्र ओळख निर्माण केली. अशीच एक खेळाडू आहे. ती म्हणजे झुलन गोस्वामी. टीम इंडियाची सर्वात वेगवान गोलंदाज झुलनचा आज (25 नोव्हेंबर) वाढदिवस आहे.
२००२ साली भारतीय संघाकडून पदार्पण केलेल्या झुलनने अल्पावधीतच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवला. आंतरराष्ट्रीय महिला एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक बळींचा विक्रम नावावर असलेल्या झुलनने गेल्या दशकभर भारतीय महिला संघाच्या वेगवान माऱ्याची धुरा समर्थपणे सांभाळली. काही काळ तिने भारतीय संघाचं नेतृत्वही केलं.
झुलन गोस्वामी हिचा जन्म २५ नोव्हेंबर १९८२ रोजी पश्चिम बंगालमधील नाडिया जिल्ह्यात झाला. ती पश्चिम बंगालमधील नाडिया येथील एका छोट्या गावाच्या चकदाहातील मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. वयाच्या १५ व्या वर्षी तिने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. क्रिकेट खेळण्याआधी,तिला फुटबॉलची आवडायचे . १९९२ मध्ये क्रिकेट खेळताना तिचा पहिला सामना टीव्हीवर १९९२ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत खेळला होता आणि ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड यांच्यात १९९७ च्या महिला विश्वचषक फायनल स्टेडियमवर राहून बेलिंडा क्लार्कची मध्ये विजय मिळवला. परंतु इतर सर्व भारतीय पालकांप्रमाणे, झुलनच्या पालकांनाही त्यांनी क्रिकेटपेक्षा अधिक अभ्यास करण्यास प्रवृत्त केले.परंतु झुलन थांबली नाही. क्रिकेटसाठी तिच्यावर प्रेम वाढले आहे असे जाणवून तिला क्रिकेट प्रशिक्षणासाठी आणखी पुढे नेले. त्यावेळी तिच्या गावात कोणत्याही क्रिकेट सुविधा नसल्यानं तिला कोलकाताला जावं लागलं.तिचे शिक्षण आणि क्रिकेटने तिचा वेळ जॅम भरून काढला पण तरीही तिने कठोर मेहनत केली.
लहानपणापासूनच तिने क्रिकेटसाठी कठोर मेहनत केली. तिने कोलकातामध्ये तिच्या क्रिकेट प्रशिक्षण केले. त्यानंतर तिने बंगाल क्रिकेट संघात प्रवेश केला. १९ वर्षाचे असताना, तिने २००२ मध्ये चेन्नईत इंग्लिश विरुद्ध एकदिवसीय सामन्यात भारताकडून पदार्पण केले होते. त्यांनी १४ जानेवारी २००२ रोजी लखनौमध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते आणि २००६ मध्ये डर्बीतर्फे टी -२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
२००२ मध्ये झुलनने भारतीय संघात पदार्पण केले. तिच्या उमेदीच्या कारकिर्दीत झुलन जगातील सर्वाधिक जलदगती गोलंदाज राहिली होती. झुलन त्या काळात १२० km/h च्या गतीने गोलंदाजी करायची. आपल्याच या कौशल्यामुळे यावर्षी फेब्रुवरीमध्ये झुलनने २०० गडी बाद करण्याचा रेकॉर्ड केला. आतापर्यंत २०० विकेट घेणारी झुलन एकमेव महिला खेळाडू आहे.
झुलन गोस्वामीला मिळालेल्या पुरस्काराविषयी
कसोटी तसेच एकदिवसीय क्रिकेटमध्ये २२ पेक्षाही कमी सरासरीसह सातत्याने किफायतशीर गोलंदाजी करणारी झुलन पदार्पणापासूनच भारतीय संघाचा प्रमुख आधारस्तंभ होती. ह्याच कामगिरीसाठी तिला २००७ साली आयसीसीच्या सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. हा पुरस्कार जेव्हा तिने एमएस धोनीच्या हस्ते स्वीकारला, तो क्षण कारकीर्दीतील एक अविस्मरणीय क्षण असल्याचं झुलन सांगते.
- २००७- आयसीसी महिला क्रिकेटर ऑफ दी इयर
- भारतीय महिला क्रिकेट संघाचा कर्णधार (२००८-२०११)
- २०१०- अर्जुन पुरस्कार
- २०१२ – पद्मश्री