बायकोला हवं तरी काय? ह्या वेब सिरीजमध्ये असणार श्रेया बुगडेचा नवा अंदाज

0
421

आता सध्या वेबसिरीजचा धुमाकूळ चालला असून रोज काहींना काही नवीन विषयावर वेबसिरीज प्रदर्शित होत असतात. मराठी चित्रपटसृष्टीही नवनवीन संकल्पनेवर वेबसिरीज प्रदर्शित होत असते. आता अशीच अभिनेता प्रियदर्शन जाधव दिग्दर्शित बायकोला हवं तरी काय ही नवीन विनोदी वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

‘बायकोला हवं तरी काय’ या सीरिजमध्ये अभिनेत्री श्रेया बुगडे मुख्य भूमिका साकारत असून अभिनेता अनिकेत विश्वासराव, निखील रत्नपारखीदेखील तिच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहेत. विशेष म्हणजे ही विनोदी वेब सीरिज असल्याचं प्रदर्शित झालेल्या ट्रेलरवरुन दिसून येत आहे.

आपला नवरा सर्वगुण संपन्न असावा असं प्रत्येक स्त्रीला वाटत असतं.तसंच बायकोला हवं तरी कायमधील या गृहिणीला देखील वाटत आहे. त्यामुळेच ती श्रीकृष्णाकडे आपल्या पतीला अपग्रेड करण्यास सागते. त्याला रुबाबदार, अध्यात्मिक गुरुसारखा शांत, प्रचंड श्रीमंत करण्यास सांगते. परंतु, या सगळ्यात अनेक मजेशीर किस्से घडताना, असं प्रदर्शित झालेल्या ट्रेलरवरुन दिसून येत आहे.

चला हवा येऊ द्या’मधून प्रेक्षकांना खळखळून हसवणारी अभिनेत्री श्रेया बुगडे नेहमी वेगवेगळ्या रुपात प्रेक्षकांसमोर येत असते. यावेळीही बायकोला हवं तरी काय या सिरीजच्या माध्यमातून श्रेया बुगडे आपल्या विनोदी अंदाजाने आणि उत्कृष्ट अभिनयाने आपल्यासमोर येत आहे.

या सीरिजमध्ये मी एका सामान्य गृहिणीची भूमिका साकारत आहे. जी कायम अपग्रेड होण्याची स्वप्न पाहते. त्याचवेळी भगवान श्रीकृष्ण तिला प्रसन्न होतो आणि तिला तिच्या संसारात किंवा नवऱ्यात जे बदल अपेक्षित असतात ते करण्यासाठी मदत करतो. पण, या सीरिजमध्ये शेवटी श्रीकृष्णाचा प्रश्न पडतो की ‘बायकोला हवं तरी काय”,असं श्रेया म्हणाली.

दरम्यान, आतापर्यंत एमएक्स प्लेअरवरील समांतर, आणि काय हवं,पांडू आणि इडियट बॉक्स अशा अनेक वेबसीरिज गाजल्या आहेत. यानंतर “बायकोला हवं तरी काय” ही नवीन सीरिज येत्या ४ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही सीरिज ६ भागांची आहे.