न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू कोरी अँडरसन यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहिर केली आहे. यापुढे कोरी अँडरसन न्यूझीलंड संघाकडून खेळताना दिसणार नाही. मागील दोन वर्षांपासून अँडरसन एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळू शकला नाही. अँडरसनची प्रेयसी अमेरिकन आहे. त्यामुळे निवृत्तीनंतर त्यानं अमेरिकेा टी 20 लीगमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे २९ वर्षीय अँडरसन यापुढे कदाचीत अमेरिका संघाकडून आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळू शकतो.
अमेरिकेत होत असलेल्या मेजर लीग टी -20 क्रिकेटपासून तो त्याची सुरुवात करणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तो आता अमेरिकेचे प्रतिनिधित्व करेल. कोरी अँडरसनची होणारी पत्नीही अमेरिकन नागरिक आहे आणि तिचे नाव मेरी शामबर्गर आहे. कोरोनाव्हायरसमुळे तो तिच्यासोबतच टेक्सासमध्ये वेळ घालवत आहे.
न्यूझीलंडसाठी प्रतिनिधित्व केलं ही माझ्यासाठी गर्वाची बाब आहे. मला अद्याप खूप क्रिकेट खेळायचं होत पण काही गोष्टींमध्ये शक्य नाही झालं. न्यूझीलंड क्रिकेटने माझ्यासाठी जे काही केले त्याचे मी कौतुक करतो ‘ अशी पहिली प्रतिक्रिया एंडरसनने निवृत्तीनंतर क्रिकबझला दिली.
अँडरसनने ४९ एकदिवसीय, ३० टी २० आणि १३ कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने एकदिवसीय सामन्यात एक हाजर १०९ धावा काढल्या आहेत. तर टी-२० मध्ये २८५ आणि कसोटीमध्ये ६८३ धावा केल्या आहेत. एकदिवसीय सामन्यात अँडरसनने न्यूझीलंडकडून सर्वात वेगवान शतक झळकावण्याचा विक्रम केला आहे. त्यानं फक्त ३६ चेंडूत शतकी खेळी केली होती. दरम्यान, अँडरसनने अमेरिकेत होणाऱ्या टी 20 स्पर्धेसाठी खेळण्याचा निर्णयासोबतच तीन वर्षांचा करार केला असल्याची माहिती आहे
अमेरिका सध्या वनडे टीमचा दर्जा मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे आणि म्हणूनच आंतरराष्ट्रीय स्तरावरील सक्रिय क्रिकेटर्सना ते समाविष्ट करण्याचा विचार करत आहेत. पाकिस्तानचा कसोटी क्रिकेटपटू सामी अस्लम आणि इंग्लंडचा विश्व चँपियन संघाचा कर्णधार लियाम प्लंकेट यांना देखील अमेरिके त्यांच्या संघात घेण्यासाठी प्रयत्न करत आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या रस्टी थेरॉन आणि डेन पिएडट यांनी यापूर्वीच अमेरिकेतून खेळायचे ठरवले आहे. कोलकाता नाईट रायडर्सच्या (केकेआर) मालकांनी लीगमध्ये गुंतवणूक जाहीर केल्याने मेजर लीग क्रिकेटला मंगळवारी मोठा दिलासा मिळाला. ही लीग 2022 पासून सुरू होऊ शकते.